सलमान खानने दुबईत राहणारी आपली पत्नी नूर आणि 17 वर्षीय मुलीबद्दल केला खळबळजनक खुलासा ! म्हणाला..

सलमान खानने दुबईत राहणारी आपली पत्नी नूर आणि 17 वर्षीय मुलीबद्दल केला खळबळजनक खुलासा ! म्हणाला..

सध्या बॉलीवूडमधून अनेक ध’क्कादा’यक बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे बॉलीवूड चांगलचं हादरून गेले आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पो’र्नोग्रा’फी गु’न्ह्यांत’र्गत अ’टक करण्यात आली. त्यानंतर सगळीकडेच त्याची चर्चा सुरु झाली. अजून कोणत्या बॉलीवूडकरांचे आणि इतर मोठाले नाव यात समोर येणार आहेत, याचीच चर्चा सुरु आहे.

मात्र त्यातच अजून एक मोठी खळ’बळज’नक बातमी समोर आली आहे. दुबईला राहणाऱ्या एका महिलेने ती सलमान खानची पत्नी असून त्या दोघांची १७ वर्षांची एक मुलगी आहे असा दावा केला आहे. सलमान खानचं लग्न नक्की केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

आता आपल्या पन्नाशी मध्ये असणारा सलमान खान अजूनही अविवाहित आहे, मात्र त्याचा चाहतावर्ग अजूनही भलामोठा आहे. अजूनदेखील अनेक मुली त्याच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न बघतात, मात्र सलमान खान लग्न करेल असं कोणालाच वाटतं नाहीये. सर्वात पहिले संगीता बिजलानी सोबत सलमान खान ने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तश्या तैयारी देखील केल्या होत्या.

मात्र, ते शक्य झाले नाही. त्यानंतर ऐश्वर्या आणि सलमान खानच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलमान तिच्यावर खूप प्रेम करत होता. मात्र तिच्यासोबत सुद्धा त्याचा विवाह होऊ शकला नाही. त्यानंतर तो लग्न करणारच नाही असच सर्वाना वाटत होतं. मात्र, कॅटरिना कैफ त्याच्या आयुष्यात आली आणि पुन्हा बॉलीवूडचा भाईजान लग्न करू शकतो असं सर्वाना वाटू लागलं.

मात्र त्या दोघांचा देखील विवाह झाला नाही, आणि सलमान खान अजूनदेखील अविवाहितच आहे. त्यातच आता, दुबईच्या एका महिलेने आपण सलमान खानची बायको असल्याचा दावा केला आहे. माघील कित्येक वर्षांपासून, सलमान खान तिच्यासोबत लग्नात असून त्यादोघांना १७ वर्षांची मुलगी आहे असा तिने दावा केला आहे.

या बातमीने सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे. सलमानचे फॅन्स नक्की खरं काय आहे, याबद्दल सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा करत आहेत. अरबाज खानच्या टॉकशोची सगळीकडेच चर्चा सुरु असताना या ट्विट बद्दल लक्षात आलं. अरबाजकडे येणाऱ्या गेस्टला, त्यांचे चाहते ट्विटच्या माध्यमातून प्रश्न विचारतात आणि ते गेस्ट त्याचे उत्तरं देतात.

याच वेळी हे ट्विट त्यांच्या समोर आले आणि सलमान व अरबाज दोघेही चकित झाले. ‘कुठे लपून बसला आहे तो डरपोक? भारतात सगळ्यांना वाटतं की तू अविवाहित आहे. मात्र दुबईमध्ये आपली पत्नी नूर आणि १७ वर्षांच्या मुलीसोबत नेहमीच फॅमिली टाइम घालवायला येत असतो. सलमान अजून किती दिवस भारताच्या लोकांनावेड बनवत राहणार आहे?’ हे ट्विट बघून सलमानच नाही तर अरबाजच्या देखील पायाखालची जमीन सरकली.

त्यावर सलमान चांगलंच चि’डला आणि म्हणाला,’भाई हे असं कोणी लिहलं आहे मला नाही माहित. असं कोणी का लिहलं आहे मी नाही सांगू शकत. ९ वर्षांचा होतो तेव्हापासून मी मुंबईला गॅलेक्सी अपार्टमेंट मधेच राहत आहे. माझं लग्न झालं असत तर मी का लपवून ठेवलं असत.

माझं लग्नही झालं नाहीये मग मुलगी असण्याचा प्रश्नच येत नाही. हे पूर्ण खोटं आहे. संपूर्ण जगाला माहित आहे, कमिटमेंट केली की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करतोच. अशी अ’फवा पसरवून लोकांना काय मिळत काय माहित?’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12