सलमान खानची बहीण अलविराच्या प्रेमात पडला होता ‘हा’ अभिनेता, पहा खान कुटुंबाचा विरोध असूनही अशा प्रकारे केले लग्न…

सलमान खानची बहीण अलविराच्या प्रेमात पडला होता ‘हा’ अभिनेता, पहा खान कुटुंबाचा विरोध असूनही अशा प्रकारे केले लग्न…

काही वर्षांपूर्वी आलेला ‘सर’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. 1993 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर या चित्रपटांमध्ये अतुल अग्निहोत्री हा नवोदित अभिनेता दिसला होता. त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. मात्र, त्यानंतर त्याला बर्‍यापैकी चित्रपट मिळाले नाही आणि त्याचे बॉलिवूडमध्ये करिअर फारसे चांगले राहिले नाही.

त्यानंतर अतुल अग्निहोत्री याने मिथुन चक्रवतीसोबत नाराज या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामध्ये सोनाली बेंद्रे दिसली होती. हा चित्रपट त्यावेळी बऱ्यापैकी चालला होता. त्यानंतर अतुल अग्निहोत्री हा नाना पाटेकर सोबत आलेल्या क्रांतिवीर या चित्रपटात दिसला होता.

हा चित्रपट देखील हिट झाला होता. मात्र, त्यानंतर त्याला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपट निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला. सलमान खान याला घेऊन त्याने बॉडीगार्ड आणि भारत या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. या दोन्ही चित्रपटांनी प्रचंड कमाई केली होती.

अतुल अग्निहोत्री हा आणखी काही चित्रपट करत असल्याचे देखील सांगण्यात येते. अतुल अग्निहोत्री याच्या प्रेमाविषयी अनेकांना माहिती नाही. अतुल अग्निहोत्री याने सलमान खानची बहिण अलविरा खान सोबत लग्न केले आहे. सगळ्यात आधी अतुल अग्निहोत्री आणि अलविरा यांची भेट जागृती या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

त्यानंतर या दोघांनी एकमेकांना भेटणे सुरुवात केले त्यानंतर हे दोघे दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र, याबाबत घरच्यांना माहिती लागली. त्यानंतर अतुल अग्निहोत्री हा खूप घाबरला होता. त्याला असे वाटत होते की, सलमान खान आपल्याला आता मारेल.

मात्र जेव्हा सलमानला ही गोष्ट कळली, त्यावेळेस सलमान याने या लग्नाला तातडीने परवानगी दिली आणि त्यानंतर या दोघांनी लग्न केले. मात्र, सलमानचे वडील सलीम खान यांना याबाबत माहिती नव्हती. काही महिन्यापूर्वी अतुल अग्निहोत्री एक मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत अतुल अग्निहोत्री म्हणाला होता की, एक दिवस मला अलविरा हिने सलीम खान यांना भेटायला थेट त्यांच्या घरी नेले होते आणि त्यानंतर अलविरा हिने वडिलांना सांगितले होते की, हा मुलगा मला आवडतो आणि याच्या सोबत मला लग्न करायचे आहे.

त्यानंतर सलीम खान यांनी माझ्याकडे एक नजर पाहिले आणि ताबडतोब लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर आम्ही लग्न केले, असे अतुल अग्निहोत्री म्हणाला. त्यानंतर 1996 मध्ये या जोडीचे लग्न झाले. आता ही जोडी सुखी संसार करत असेल तर सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12