समंथा झाली मुंबईकर, घेतले सी-फेसिंग घर, पहा तिच्या आलिशान घराचे फोटो…

समंथा झाली मुंबईकर, घेतले सी-फेसिंग घर, पहा तिच्या आलिशान घराचे फोटो…

काहीच दिवसांपूर्वी समंथाच्या आगामी शकुंतला चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामध्ये समंथाचा लूक बघून चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. समंथाचे चाहते सध्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहे. बॉलीवूडमध्ये देखील या चित्रपटासाठीची उत्सुकता बघितली जात आहे.

अभिनेत्री समंथा आज केवळ दाक्षिणात्यच नाही तर बॉलीवूड मधलं एक ओळखीच नावं बनलं आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये जे प्रेम चाहत्यांनी समंथाला दिले तेच प्रेम तिला बॉलीवूडमधून देखील मिळत आहे. द फॅमिली मॅन च्या दुसऱ्या सीझनमध्ये समंथाने आपल्या जबरदस्त अभिनयाचा परिचय दिला.

एरव्ही ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या सामंथाने या सिरीजमध्ये अगदी हटके भूमिका साकारली. त्यामुळे सगळीकडूनच तिचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. अभिनेत्री समंथा आपल्या क्युटनेस साठी देखील ओळखली जाते. आपल्या स्मितहास्याने ती चाहत्यांनी घायाळ करते. मात्र त्याच समंथाने पुष्पाच्या ‘ऊ अंतवमा’ गाण्यामधून आपल्या बोल्ड आणि हॉट लूकने सगळ्यांना अक्षरशः वेड लावले.

आजदेखील या गाण्याची जादू कायम आहे. समंथा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा समंथा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी अभिनेत्री आपल्या नवीन प्रॉपर्टी मुळे चर्चेत आली आहे. समंथाने मुंबईमध्ये नवं आलीशान घर खरेदी केलं असल्याची बातमी समोर आली आहे.

समंथाने मुंबईमध्ये थ्री-बेडरुम फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटमधून समुद्राचा भन्नाट व्ह्यू दिसतो. या फ्लॅटची किंमत देखील चांगलीच गडगंज आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन समंथाने स्वत:चा एका फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सनसेट व्ह्यूबरोबर पोज देत असल्याचं दिसत आहे.

तिचा हा फोटो मुंबईमधील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमधला नसून एका खास इमारती मध्ये क्लिक करण्यात आलेला आहे. या फोटोवरून सर्वाना स्पष्ट झालं आहे की, समंथाने मुंबईमध्ये आलीशान घर विकत घेतलं आहे. तर आता ऊ अंतवा गर्ल समंथा देखील मुंबईकर बनली आहे. समंथाचा हा फ्लॅट तब्बल १५ कोटी रुपयांचा आहे.

मागील वर्षी समंथाने आपल्या पूर्वश्रमीच्या पतीचं हैदराबादमधील घर विकत घेतलं होतं. समंथा आणि नाग चैतन्य लग्नानंतर ज्या घरात राहत होते तेच घर समंथाने विकत घेतलं. घटस्फोटानंतर ते दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते, मात्र तरीही समंथाने हेच घर विकत घेण्याला प्राधान्य दिले.

या घराशी तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आणि आठवणी जोडलेल्या असल्याने समंथाने हे घर विकत घेतल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, समंथा सध्या आपल्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये समंथा वरुण धवनबरोबर दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12