‘सना खान’नंतर ‘बिग बॉस’मधील ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादा’यक निर्णय! हिजाब घालून फिरता यावं म्हणून सोडलं बॉलिवूड…

काही वर्षांपूर्वी आमीर खान याचा दंगल चित्रपट आपण पाहिला असेल. या चित्रपटात झायरा वसीम या तरुण अभिनेञीने काम केले होते. तिने अतिशय उत्कृष्टरित्या या चित्रपटात काम केले होते. मात्र हा चित्रपट झाल्यानंतर लगेचच तिने आता यापुढे चित्रपट करणार नाही, असे सांगितले होते.

त्यानंतर तिच्या निर्णयाची चर्चा बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. याचबरोबर धार्मिक वातावरणात आता मी राहणार असल्याचे तिने सांगितले होते. आता देखील एका अभिनेत्रीने कायम हि’जा’बमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनेत्री कोण आहे याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

बिग बॉस हा शो हिंदीमध्ये लोकप्रिय ठरला आहे. अभिनेता सलमान खान याने पहिल्यापासून या शोचे सूत्रसंचालन केले आहे, तर बिग बॉस 11 मध्ये सहभागी झालेली एक स्पर्धक आता कायमस्वरूपी हि’जा’ब घालणार असल्याचे सांगण्यात येते. तिने याबाबत स्वतः माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून देशात हि’जाबवरून देशांमध्ये मोठे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या एका शाळेमध्ये हि’जाब घालून येण्यास मुलींना बं’दी करण्यात आली. त्यानंतर हे प्र’करण देशभरामध्ये प’सरले होते. त्यानंतर शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नको, असे देखील म्हणणारे बरेच जण होते.

आता हे लोण बॉलिवूडमध्ये देखील पोहोचले आहे. बिग बॉस 11 शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री महजबी सिद्दीकी हिने तिचा पेहराव नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे तिची एकच चर्चा सुरू झाली आहे. आता महजबी हिने सांगितले आहे की, मी आता यापुढे बॉलीवूड नाही तर धर्माच्या वाटेवर चालणार आहे.

त्यामुळे ती आता बॉलिवूड सोडणार की काय अशी चर्चा देखील यानिमित्ताने सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडिया वर एक मोठी पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये तिने सविस्तर माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये महजबी म्हणते की, गेल्या दोन वर्षांपासून मला काहीच कळत नव्हतं. मी काय करु, ज्यामुळे मला शांतता मिळेल.

त्यामुळे मी आता हा निर्णय घेतला आहे. अ’ल्लाह’चा शब्द डावलून कोणालाही कधीच उसंत मिळत नाही. तुम्ही कोणालाही कितीही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या व्यक्ती आनंदी होत नाहीत, असे ती म्हणाली. पुढे ती म्हणते की, अल्लाहने माझे सर्वकाही पाप हे माफ करावे. मी आता ध’र्माच्या वाटेवर चालणार आहे. देशभरामध्ये यावर वा’तावरण सुरू असताना महजबीने हा निर्णय घेतल्याने बॉलीवूड मध्ये तिच्या निर्णयाची च’र्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12