श्रेयस तळपदेसोबत ‘हे’ दिग्ग्ज कलाकार बनले ‘पुष्पा’ सिनेमातील इतर कलाकारांचे आवाज…

सध्या ‘पुष्पा’ सिनेमाने जवळपास सर्वांनाच चांगलंच वेडं लावलं आहे. को’रोनाच्या काळात, थिएटरमध्ये केवळ ५० टक्केच क्षमता असली तरीही या सिनेमाने भरगोस कमाई केली आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत एव्हाना ३५० कोटींचा आकडा देखील पार केला आहे. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या नावाचा डंका सर्वत्र गाजत आहे.
अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री समंथा या दोघांचे आयटम सॉन्ग तर सगळीकडेच सुपरहिट ठरत आहे. त्याचबरोबर रश्मिकाचे ‘सामी सामी’ गाणं देखील चांगलंच सुपरहिट ठरत आहे. या सिनेमाच्या तब्ब्ल पाच लाखाहून अधिक रिल्स बनवण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये या रिल्स बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हिंदी व्हर्जन चांगलंच हिट ठरत आहेत.
अल्लू अर्जुनला अभिनेता श्रेयस तळपदेने आपला आवाज दिला, आणि खुद्द अल्लू अर्जुनने देखील त्याचे आभार मानले. अल्लू अर्जुनच्या खऱ्या आवजाची लकब आणि तोच राऊडीपणा हुबेहूब आपल्या आवजात घेऊन येण्यात श्रेयसला यश मिळाले आहे. त्यामुळे सध्या त्याचे देखील चांगलेच कौतुक होत आहे. मात्र हिंदी डब करताना इतर कोणत्या कलाकाराला कोणाचा आवाज आहे हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
१. पुष्पराज उर्फ अल्लू अर्जुन- श्रेयस तळपदे: अल्लू अर्जुनच्या पुष्पा या पात्रासाठी अभिनेता श्रेयस तळपदेने आपला आवाज दिला आहे. आपल्या आवाजाने त्याने चांगलीच जादू केली म्हणून त्याचाच आवाज या चित्रपटातील पात्राचा खरा आवाज असल्याचे जाणवते.
२.श्रीवल्ली उर्फ रश्मिका मंदान्ना- स्मिता रोजमेयर : व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट स्मिता रोजमेयरने अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या श्रीवल्लीच्या पात्रासाठी आपला आवज दिला
आहे.
३. पुष्पाचा मित्र – साहिल वैद बॉलिवूड अभिनेता साहिल वैद्यने अल्लू अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला आपला आवाज दिला आहे. शेरशाह, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया सारख्या अनेक चित्रपटात साहिल झळकला होता.
४.भैरोसिंग शेखावत उर्फ फहाद फासिल-राजेश खट्टर फहाद फासिल हा अभिनेत्याने चित्रपटात मुख्य खलनायक अर्थात आयपीएस अधिकारी भैरोसिंग शेखावत यांची भूमिका साकारली. त्यांना अभिनेता राजेश खट्टर यांनी आपल्या आवाजाने जिवंत केले आहे.
५. श्रीनू उर्फ सुनील-उदय सबनीस या चित्रपटात मंगलम श्रीनूची भूमिका अभिनेता सुनील यांनी साकारली आहे. त्यांना कलाकार उदय सबनीस यांना आवाज दिला आहे.
६. जॉली रेड्डी उर्फ धनंजय-मनोज पांडे :अभिनेता धनंजय याने या चित्रपटात जॉली रेड्डीची भूमिका साकारली असून अभिनेता मनोज पांडेने त्याला आपला आवाज दिला आहे.
७. कोंडा रेड्डी उर्फ अजय शाह-राजेश जॉली :राजेश जॉली यांनी कोंडा रेड्डीची भूमिका साकारणारा अभिनेता अजय शाह याला आवाज दिला आहे.
८. दाक्षायणी उर्फ अनुसुय्या भारद्वाज-सबिना मौसम : सबिना मौसम यांनी मंगलम श्रीनूची पत्नी दाक्षायणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनुसुय्या भारद्वाजच्या पात्राला आपला आवाज दिला आहे.