शुभमन गिल नाही तर ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय सारा तेंडुलकर, व्हायरल फोटो पाहून सचिन देखील झाला चकित..

शुभमन गिल नाही तर ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय सारा तेंडुलकर, व्हायरल फोटो पाहून सचिन देखील झाला चकित..

आजच्या इंटरनेटच्या काळात कोणाचेच आयुष्य प्रायव्हेट राहील नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच जण एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे प्रत्येकालाच समजते. खास करून सेलेब्रिटीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक जण त्यांना सोशल मीडिया वरती फॉलो करतात.

सोशल मीडिया वरती सेलिब्रेटी आणि त्यांच्या मुलांचा अर्थातच स्टार किड्सचा देखील खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. हे स्टार किड्स देखील मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या चांगलाच फायदा घेतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घडामोडी देखील ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवतात.

सोशल मीडिया वरती कायमच स्टार किड्सच्या पोस्टची चर्चा रंगल्याचं बघायला मिळतं. सध्या अशाच एका स्टार किडची सगळीकडे चर्चा रंगली आहे. बॉलीवूड नाही तर प्रसिद्ध क्रिकेटपटूची मुलगी सध्या चांगलीच बातम्यांमध्ये आली आहे. आता तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर बद्दल बोलत आहोत.

सारा तेंडुलकर सोशल मीडिया वरती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडिया वरती ती आपले अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते. काहीच दिवसांपूर्वी साराने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिचं पहिलं पहिलं मॉडलिंग असाइनमेंट बघून चाहत्यांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली. तिचा इतका ग्लॅमरस अवतार बघून सर्वजण तिच्यावर फिदा झाले आहेत.

मात्र सारा प्रसिद्ध क्रिकेटपटू शुभमन गिल वर फिदा झाल्याचं बोललं जात होतं. त्या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली अनेक वेळा त्या दोघांना पार्टी करताना बघितलं गेलं आहे. त्यामुळे सारा आणि शुभमंग एकमेकांच्या प्रेमात असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यातच सोशल मीडिया वरती दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं.

आणि त्यामुळे कदाचित त्यांचे ब्रेकअप झालं असा कयास अनेक जण लावत आहेत. सारा अली खानच्या रूपात शुभमनला एक नवीन खास मैत्रीण मिळाली आहे. तर त्याबाबतीत सारा तेंडुलकर देखील मागे नाही. शुभमन गिल म्हणता म्हणता आता सारा तेंडुलकरचे दुसऱ्याच व्यक्तीसोबतचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

सिद्धार्थ केतकर नावाच्या अभिनेत्यासोबत सारा तेंडुलकर बुलेट राईडवर गेली होती. सध्या दोघांचा एक फोटो व्हायरल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्या दोघांनी हेल्मेट घातलेला दिसत आहे. विशेष बाब म्हणजे सिद्धार्थ केतकरने सेल्फी घेतली आहे. आणि त्यावेळी त्याने सारा तेंडुलकरच्या कमरेवर हात ठेवून पोज दिली आहे.

यामध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. दोघेही यावेळी खूप आनंदी दिसत आहेत. एका फॅन पेजने सारा तेंडुलकरचा हा फोटो शेअर केला आहे. यावर हजारो लाईक्स मिळाले असून कमेंट बॉक्स मात्र खाजगी ठेवण्यात आला आहे. या फोटोवर कोणत्याही प्रकारचं कॅप्शन देखील दिलेली नाही. यामुळे या दोघांमध्ये नक्की मैत्री आहे का प्रेम अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

दरम्यान, सिद्धार्थ केरकरने13 आठवड्यांपूर्वी सारा तेंडुलकरसोबतचा हा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्याने सारा तेंडुलकरला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर फोटोवर प्रतिक्रिया देताना सारा तेंडुलकरने, ‘धन्यवाद बेस्टी…’ असं लिहलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12