शाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..

काही वर्षांपूर्वी आलेला चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. हा चित्रपट रोहित शेट्टी याने दिग्दर्शित केला होता.या चित्रपटात शाहरुख खान याने भूमिका केली होती. रोहित शेट्टी याने शाहरुखला घेऊन केलेला हा पहिलाच चित्रपट होता. नाहीतर रोहित शेट्टी हा कायम अजय देवगनसोबत चित्रपट करत असतो.

तरी देखील हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण हिची भूमिका होती. या चित्रपटातील गाणे देखील अतिशय प्रचंड गाजले होते. या चित्रपटातील ‘चेन्नई एक्सप्रेस’ या टायटल सॉंग साठी एस पी बाल सुब्रमण्यम यांनी आवाज दिला होता. हे गाणं देखील खूप गाजले होते. तसेच चित्रपटातील इतर गाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडले होते.

रोहित शेट्टी याने आपल्या करिअरची सुरुवात जमीन या चित्रपटापासून केली होती. चित्रपटांमध्ये अजय देवगन हा दिसला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मात्र, असे असले तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आजही हा चित्रपट पाहिला जातो. त्यानंतर अजय देवगन आणि रोहित शेट्टी हे समीकरण जणू एवढे जमले की, या जोडीने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

गोलमाल सिरीज मध्ये त्यांनी जवळपास सर्वच चित्रपट चांगले दिलेले आहेत. हे चित्रपट टीव्हीवर खूप मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. रोहित शेट्टीने अजय देवगन सोबत सिंघम चित्रपट केला होता. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर सिंघमचा त्यांनी दुसरा भाग देखील काढला होता. या चित्रपटाचे नाव सिंघम रिटर्न्स होते.

‘आता माझी सटकली’ हे गाणे देखील प्रचंड गाजले होते. तसेच सिंघम मधील अजय अतुल यांनी लयबध्द केलेले सर्व गाणे खूप चांगले होते. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील वन टू थ्री फोर हे गाणे खूप गाजले होते. या गाण्यांमध्ये प्रियामनी ही दिसली होती. प्रियामणी ही दक्षिणेतील मोठी स्टार आहे.

प्रियामणी ही नुकतीच आलेल्या ‘द फॅमिली मॅन टू’ या वेब सिरी मध्ये प्रचंड गाजली आहे. तिने चेन्नई एक्सप्रेस मधील शाहरुख खानचा सोबतचा अनुभव शेअर केला आहे. प्रियामणी म्हणाली की, शाहरुख खान हा अतिशय चांगला व्यक्ती आहे. तो आपल्या सहकारी कलाकारांची खूप काळजी घेत असतो. मी या गाण्याच्या चित्रीकरणासाठी एक दिवस आधीच वाई येथे पोहोचले होते.

त्यानंतर माझी थेट-भेट शाहरुख खान सोबत झाली होती. हे गाणे जवळपास पाच दिवस चित्रित करण्यात आले होते. हे गाणे वाई येथे चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळे शाहरुख खान सोबत असलेला वेळ हा खूप चांगला होता, असेही ती म्हणाली. या वेळी मी शाहरुख खान सोबत आयपॉडवर ‘कोण बनेगा करोडपती’ खेळले होते. त्यानंतर शाहरुख खानने मला तीनशे रुपये गिफ्ट म्हणून दिले होते. हे तीनशे रुपये मी आजही सांभाळून ठेवले आहेत, असेही प्रियामनी म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12