शाब्बास रे पट्ट्या ! सिद्धार्थ जाधवने आपल्या आई वडिलांसाठी केलं अभिमानस्पद काम; वाचून तुम्हीही कराल त्याच कौतुक!

सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी आपली स्वप्ने पूर्ण करणे एक मोठे आव्हान असते. काहींना हे आव्हान पेलता येते तर काहींचा संघर्ष अर्धवटच राहतो. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी मोठाली स्वप्न बघून ती पूर्ण करणे खरोखर आयुष्यभराचा संघर्षच असतो. जेव्हा हे स्वप्न मनोरंजन सृष्टीशी निगडित असतात त्यावेळी त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
कोणतीही पार्श्वभूमी नसताना मनोरंजन सृष्टी मध्ये स्वतःची जागा निर्माण करणे एक मोठे आव्हान असते. मात्र काही मोजक्याच कलाकारांनी हे आव्हान स्वीकारले आणि पूर्णत्वास देखील नेले. अशाच काही कलाकारांपैकी एक मराठमोळ सिद्धार्थ जाधव देखील आहे.
आज सिद्धार्थ जाधव ला कोण ओळखत नाही? केवळ मराठीच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील सिद्धार्थने आपली खास जागा निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव ने आपल्या हटके अशा विनोदी शैलीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. समोर बसलेल्या प्रेक्षकाला क्षणामधे हसायला लावण्याची अप्रतिम अशी कला सिद्धार्थ जाधव कडे आहे.
त्यामुळे आज मनोरंजन सृष्टीमध्ये सिद्धार्थ जाधव ला एक मानाचे स्थान आहे. सिंबा आणि सूर्यवंशी सारख्या बॉलीवुड मूवी मधून काम करत सिद्धार्थने तिथेही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. तसे तर सिद्धांत जाधव नेहमीच चर्चेत असतो. परंतु यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
स्वतःचे कर्तुत्व सिद्ध केल्यानंतर आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा प्रत्येक मुलाच्या मनात असते. जेव्हा ही इच्छा पूर्ण होते तेव्हा मोठा आनंद मिळतो. सध्या याच आनंदाची अनुभूती सिद्धार्थ जाधव करत आहे. आपल्या आई-वडिलांसाठी बघितलेला एक स्वप्न त्यांन पूर्ण केला आहे.
त्यामुळे तो सध्या खूप जास्त आनंदी आहे. याबद्दलची माहिती स्वतः सिद्धार्थने दिली आहे. एक पोस्ट शेअर करत सिद्धार्थ, आपण आपले स्वप्न पूर्ण केलं असल्याचं बोलला आहे. सध्या सिद्धार्थ यश आणि कीर्तीच्या शिखरावर बसला आहे. याच दरम्यान त्याने सर्वात मोठ यश मिळवला आहे. त्याने आपल्या आई-वडिलांसाठी एक सुंदर स घर खरेदी केला आहे.
सिद्धार्थने घराबाहेरील नेमप्लेटचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याच्या आई आणि वडिलांचं नाव आहे.हा फोटो शेअर करत त्याने म्हटलंय कि, ‘स्वप्नपूर्ती…हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.’ सिद्धार्थ च्या या पोस्ट वरती केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील भरभरून प्रतिसाद देत आहेत.
दरम्यान, सध्या सिद्धार्थ त्याच्या जत्रा 2 चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जत्रा मधून सिद्धार्थने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये एक खास जागा निर्माण केली होती. आजही या चित्रपटाचा आपला खास असा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक उत्साहीत आहेत.