शम्मी कपूरवर प्रेम असूनही का केलं नाही लग्न? पहा 60 वर्षांनी समोर आली मुमताज यांची प्रेम कहाणी…

७०-८० च्या दशकातील अनेक चित्रपट आज देखील आपण आनंदाने बघतो. बोलायचंच झालं तर, हेच चित्रपट बघत आपण मोठे झालो. त्यामुळे जुन्या कलाकारांची देखील सध्या चांगलीच ओळख आताच्या पिढीला देखील आहे. बॉलीवूडचा सुवर्णकाळ म्हणून ६०-७० च्या दशकाकडे बघितलं जात.
याकाळात बॉलीवूडने आपला सुवर्ण काळ अनुभवला आणि त्यानंतर पासूनच चित्रपटांची क्रेझ सगळ्यांमध्ये वाढली. अनेक दिग्गज कलाकारांना स्टारडम उपभोगायला मिळालं. त्या दशकातील अभिनेत्रींना तर चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावरच घेतलं होत. हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन, वैजंतीमाला, मुमताज सारख्या अभिनेत्रींचे सुंदर रूप पहिले की, चाहत्यांच्या नजर आजही त्यांच्यावर खिळून राहतात.
असच काही अभिनेत्री मुमताज यांच्याबद्दल देखील बोलायला हरकत नाही. सतत हसरा चेहरा आणि डोळे दिपून टाकणार सौंदर्य यामुळे मुमताज यांचा त्याकाळात खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. मुमताजने ‘स्त्री’ या चित्रपटातून आआपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला.
मुमताजने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवताच तिच्यासमोर कौतुकाची आणि पुरस्कारांची ओढ लागली होती. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही लोकांना मुमताजची 60 आणि 70 च्या दशकातील गाणी ऐकायला आवडतात. मुमताजने बिंदिया चमकेगी, दो घुट पिता दे अशी अनेक सुंदर गाणी केली आहेत.
मध्यतंरी सोशल मीडियावर याच गाण्याची ट्रेंड बघायला मिळाली. याचाच अर्थ त्यांची गाणी आजच्या पिढीला देखील आपल्या मोहात टाकते. मुमताज यांचं वय ७४ वर्ष आहे. माघील बऱ्याच काळापासून त्यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला आहे. मात्र असं असलं तरीही आजदेखील त्या आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.
कदाचित म्हणून त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातबद्दल लोकांना फार काही माहिती नाही. आता पुन्हा एकदा, मुमताज चर्चेत आली आहे. मुमताज नुकतीच इंडियन आयडॉल 13 च्या शोमध्ये आली होती. यादरम्यान, 1960 च्या दशकात दिवंगत अभिनेता शम्मी कपूरने जेव्हा तिला लग्नाचा प्रस्ताव दिला तेव्हा तिने कसा प्रतिसाद दिला हे तिने सांगितले.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने शनिवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये ती अभिनेता धर्मेंद्रसोबत रोमान्स करताना दिसली होती. शो दरम्यान, जेव्हा आदित्य नारायण म्हणाला की, मुमताज जी आणि शम्मी जीची जोडी कोणती होती? यावर उत्तर देताना मुमताज म्हणाल्या, ‘शम्मी कपूरने अचानक सांगितले की, त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे.
त्यावेळी मी फक्त 17 वर्षांची होते. आणि त्यावेळी मला लग्न करायचे नव्हते, पण अनेक वेळा मला त्याची आठवण येते.’ त्यानंतर अभिनेता धर्मेंद्रबद्दल बोलताना ती म्हणाली की, तिला धरमजी खूप आवडतात. त्यानंतर तिने धर्मेंद्रला मिठीही मारली. यानंतर उत्तर देताना धर्मेंद्र म्हणाले की, मुमताजला पाहिल्यानंतर भावना जाग्या होतात.
यावर मुमताज लाजली. दरम्यान, 1974 मध्ये तिने बिझनेसमन मयूर माधवानीसोबत लग्न केले होते. या लग्नानंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. त्यांच्या एका मुलीचे लग्न फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानशी झाले आहे.