सोनाक्षीला नाही तर ‘या’ व्यक्तीला मिळणार ‘शत्रुघ्न सिन्हा’ची पूर्ण संपत्ती, स्वतः शत्रुघ्न सिन्हाने केला खुलासा..

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावली आहे. तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर देश विदेशात आपले नाव कमावले. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून असा प्रघात आहे की, एखाद्या दिग्गज अभिनेत्याच्या संपत्तीवर त्यांच्या मुलांचा हक्क असतो.
तसेच मुलींचाही हक्क असतो. मात्र, काही जणांच्या बाबतीत यामध्ये अपवाद पाहायला मिळतो. हे फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर जगभरात घडते. कारण वडिलांच्या कमाईवर फक्त त्यांच्या मुलांचाच हक्क आहे. जगात क्वचितच असे वडील आहेत जे आपल्या मुलांशी भेदभाव करतील. पण बॉलीवूडच्या एका सुपरस्टारने असेच काही केले असून माझ्या संपत्तीतून माझ्या मुलीला काहीही मिळणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
आम्ही ज्या दिग्गज अभिनेत्याबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून बॉलिवूडचे प्रसिद्ध शॉटगन शत्रुघ्न सिन्हा आहेत. मात्र, शत्रुघन सिन्हा नेमके असे का म्हणाले या बाबत आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये माहिती देणार आहोत. शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडचे एक प्रसिद्ध स्टार आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप नाव, आणि प्रसिद्धी मिळवली आहे.
सध्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे एकूण ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये त्यांच्याकडे आलिशान गाड्या, बंगले आणि शेत जमिनीचा समावेश असल्याचेही सांगण्यात येते. याशिवाय शत्रुघ्न सिन्हा हे राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. शत्रुघ्न सिन्हा काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.
अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. शत्रुघन सिन्हा अनेक वर्ष भाजपमध्ये होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत मतभेद झाल्याने त्यांनी आता पक्षांतर केले आहे. या व्हिडिओमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या संपत्तीबद्दल बोलत आहेत.
व्हिडिओमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणत आहेत की, माझी जी काही संपत्ती आहे त्याच्याशी सोनाक्षीचा काहीही संबंध नाही. यावरून शत्रुघ्न सिन्हा आपली कोणतीही संपत्ती आपली मुलगी सोनाक्षी सिन्हा हिला देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शत्रुघ्न सिन्हा जी यांनी एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. ही मुलाखत देण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा मुलगी सोनाक्षीसोबत गेले होते.
मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सोनाक्षीला माझ्या संपत्तीतून काहीही मिळणार नाही. माझी सर्व मालमत्ता माझ्या दोन मुलांची म्हणजेच लव आणि कुश यांची असेल. वडिलांच्या या वक्तव्यावर सोनाक्षीने अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, हा माझ्या वडिलांचा मेहनतीचा पैसा आहे, त्यांची संपत्ती कोणाला द्यायची ही त्यांची इच्छा आहे.
त्यामुळे मी यामध्ये अजिबात बोलणार नाही किंवा त्यांना याचा जाब नाही विचारणार नाही. सोनाक्षी सिन्हाचे हे उत्तर ऐकून शत्रुघ्न सिन्हा यांनी तिला मिठीत घेत हे माझे संस्कार असल्याचे सांगितले. मात्र, खरे सांगायचे झाले तर शत्रुघन सिन्हा हे सोनाक्षीची परीक्षा घेत होते आणि या परीक्षेमध्ये सोनाक्षी सिन्हा उत्तीर्ण झाली, असे शत्रुघन सिन्हा यांनी या वेळी सांगितले आणि दोघेही नंतर भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले.