‘वेड’ चित्रपटाच्या यशानंतर रितेशने केली मोठी घोषणा ! पुन्हा एकदा प्रेक्षकांना देणार मोठं सरप्राईज…?

हिंदी तसेच सध्या मराठीमध्येही प्रसिद्ध असणारा रितेश देशमुख सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीला रितेशने अनेक हिंदी चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा अशी ओळख असूनही तो स्वतःही एक ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला.
आज रितेश फक्त हिंदीच नाही तर मराठीमध्येही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. जेनेलियासोबत लग्न केल्यानंतर रितेश आपले वैवाहिक आयुष्य खूपच आनंदात जगत आहे. रितेश पत्नीसोबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असतो. तो नेहमी पत्नीसोबत मिळून अनेक फनी विडिओ शेअर करत असतो. आणि चाहत्यांना देखील त्याचे हे विडिओ खूपच आवडतात.
रितेश सध्या हिंदी कमी दिसत असला तरी मराठीमध्ये नुकताच त्याचा वेड हा चित्रपट रिलीज झाला पण त्याआधी त्याने लय भारी चित्रपट केला होता. आणि हा चित्रपट प्रचंड प्रमाणात चालला देखील होता. पण पण रितेश सध्या त्याच्या वेड या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रितेशने खूप जोरात या चित्रपटाचे प्रोमोशन केले होते.
सोबत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी त्याला प्रोमोशनसाठी मदत केली होती. दरम्यान, वेड या चित्रपटातून जेनेलिया पहिल्यांदाच मराठी सिनेमात पदार्पण करत आहे. तसेच ‘तेरे नाल लव हो गया’ पुन्हा दोघांनी स्क्रिन शेअर केली आहे. ३० डिसेम्बरला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. आणि सुरुवातीपासूनच या चित्रपटाने चांगलीच कमाई केल्याचे आकडे समोर आले आहेत.
कारण या सिनेमाचे कथानक प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडले आहे. क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि त्याच्या सच्चा प्रेमाची गोष्ट वेड या सिनेमात पाहायला मिळते. त्यामुळे तरुणाईला हा चित्रपट चांगलाच आवडल्याचे दिसत आहेत. त्यामुळे अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.
दरम्यान, रितेश वेड चित्रपटाच्या यशानंतर एक विडिओ शेअर करून आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं खास करून सत्या आणि श्रावणीच्या लव्हस्टोरीबद्दल असणार आहे. या गाण्यात प्रेक्षकांना पुन्हा रितेश आणि जिनिलियाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
रितेशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये चित्रपटातील सत्या त्याच्या जिवलग मित्रासोबत गप्पा मारत आहे. रितेशचा मित्र त्याला ‘वेड’ चित्रपटाविषयी जाणीव करून देतो कि ‘वेड’ मध्ये सत्या आणि श्रावणीच शेवटी एकत्र आले असले तरी या दोघांचं एकही गाणं नाहीये. त्यावर रितेश देखील विचार करू लागतो आणि सत्या आणि श्रावणीच्या गाण्यासाठी तयार होतो.
या व्हिडिओला रितेशने ‘लवकरच येत आहे…’ असा कॅप्शन दिला आहे.रितेशने केलेल्या या घोषणेमुळे प्रेक्षक खूपच उत्सुक झाले असून काही वेळातच रितेशची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.