विराट-रोहितलाही जमलं नाही असं मोहम्मद शमीने केलं काम, पहा घेतली एवढी महागडी कार, किंमत पाहूनच थक्क व्हाल…

विराट-रोहितलाही जमलं नाही असं मोहम्मद शमीने केलं काम, पहा घेतली एवढी महागडी कार, किंमत पाहूनच थक्क व्हाल…

आपल्या देशामध्ये क्रिकेटपटूंचा थाट एखाद्या सेलिब्रेटी किंवा नेते मंडळी पेक्षा कमी नसतो. अनेक क्रिकेटपटू अगदी सेलिब्रिटींचे आयुष्य जगत आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या क्रिकेटपटूने महागड्या वस्तूची खरेदी केली अशा बातम्या येतच असतात.

यामध्ये कधी कोणी महागडे घड्याळ तर, कधी कोणी आलिशान घर घेतलं अशा बातम्या रंगतच असतात. मध्यंतरी एम एस धोनीने पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये आलिशान फार्म हाऊस विकत घेतले होते. त्याच्या बातम्या चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली ने एक महागडी गाडी घेतल्याच्या बातम्या देखील रंगल्या होत्या.

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या सारखे खेळाडू देखील याबाबतीत प्रकाशझोतातच असतात. काही वर्षांपूर्वी सचिनने फरारी गाडी खरेदी करत बातम्या रंगवल्या होत्या. फरारी गाडी असणारा सचिन त्याकाळी एकमेव भारतीय क्रिकेटपटू होता. आता पुन्हा एकदा एका खेळाडूने अशीच एक आलिशान कार खरेदी केली आहे.

विशेष म्हणजे एम एस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंकडे देखील इतकी महागडी आलिशान कार नाहीये. हा खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी गाड्यांसाठी चांगलाच वेडा आहे. त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. आता त्याच्या कार कलेक्शन मध्ये अजून एका गाडीची भर पडली आहे.

काहीच दिवसांपूर्वी मोहम्मद शमीने एस टाइप स्पोर्ट्स जग्वार कार विकत घेतली आहे. मोहम्मद शमी ने विकत घेतलेल्या या कारची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून मोहम्मद शमीने यापूर्वी त्याच्या रॉयल इन्फिल्ड मोटर बाईक चे फोटो शेअर केले होते आणि आता काहीच दिवसात मोहम्मद शमीने ९८.१३ लाख रुपयांची ही महागडी लक्झरी कार विकत घेतली आहे.

विशेष म्हणजे शमीने विकत घेतलेली ही लक्झरी कार अद्याप भारताच्या बड्या बड्या बॅट्समनला देखील विकत घेता आलेली नाही. ही गाडी विकत घेण्यामध्ये आयपीएलचे देखील मोठे योगदान आहे. मागील महिन्यातच मोहम्मद शमीने रॉयल इन्फिल्ड कॉन्टिनेन्टल जीटी विकत घेतली. याची शोरूम किंमत ३.३२लाख रुपये आहे.

एका नावाजलेल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शमी ची संपत्ती तब्बल 45 कोटी रुपये आहे. त्याची सध्याची कमाई 60 ते 70 लाख आणि याचाच अर्थ वर्षाची कमाई अंदाजे आठ ते नऊ कोटी रुपये आहे. आयपीएलच्या मागील मोसमाच्या लिलावात गुजरातने शमेला ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

शमी सोबत बीसीसी आणि ग्रेड ए-चा करार केला आहे. यामधून त्याला पाच कोटी रुपये मिळतात. यासोबतच त्याचे इतर देखील अनेक छोटे मोठे बिझनेस आहेत. त्याने खरेदी केलेली कार अगदी आलिशान आणि विविध सोयींनी परिपूर्ण आहे. भारतामध्ये जॅग्वार एफ टाइपची तीन मॉडेल मिळतात, याची किंमत 98.13 लाखांनी सुरू होते आणि 1.53 कोटींपर्यंत जाते.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.