‘विनोद’ मेहरा यांची दुसरी ‘पत्नी’ आता आहे या प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी…या पद्धतीने त्यांनी ‘पळून’ जाऊन केले होते लग्न कारण…

सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि समोरच्याला क्षणात जिंकून घेईल अशा हास्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणजे विनोद मेहरा, बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत विनोद मेहरा यांनी सर्वांना वेड लावले होते खास करून मुलींना पण त्या काळातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखले जाणारे विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत.
पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत कायम आहेत. बॉलिवूडचे हँडसम हिरो विनोद मेहरा यांचा जन्म पा’कि’स्ता’नातील पेशावर येथे ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये झाला. विनोद यांचं स्टारडम इतर कोणत्याही स्टारला लाजवेल असं होतं. जेव्हा त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायचा तेव्हा इतर कोणत्याच अभिनेत्याची त्यांच्या स्टारडमशी तुलना केली जाऊ शकत नव्हती.
तसे विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना ब्रो’कासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच वर्षांत बिंदिया गोस्वामी त्यांच्या आयुष्यात आल्या. बिंदीया गोस्वामी या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. जीवन ज्योती या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात केली.
खट्टा मिठ्ठा, गोलमाल यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. पण विनोद आणि बिंदिया यांनी चार वर्षांच्या संसारानंतर वेगळे व्हायचे ठरवले आणि घ’टस्फो’टानंतर एक वर्षांनी बिंदिया यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्यासोबत लग्न केले आणि अभिनयक्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.
‘वॉ’र’ सिनेमांसाठी ओळखले जाणारे लेखक, दिग्दर्शक व निर्माता जेपी दत्ता अर्थात ज्योती प्रकाश दत्ता यांनी बिंदिया यांच्याशी लग्न केले. आपणास सांगू इच्छितो कि जेपी दत्तांचे वडील ओपी दत्ता हे स्वत: दिग्दर्शक आणि लेखक होते. साहजिकच जेपी यांना बालपणापासूनच चित्रपटांची ओढ होती. बॉर्डर, एलओसी, पलटन असे अनेक चित्रपट त्यांनी बनवले.
ख-या आयुष्यात जेपी अतिशय शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण लग्नाच्या बाबतीत मात्र त्यांच्या परस्परवि’रो’धी स्वभावाचे दर्शन घडले आणि जेपी यांनी घ’टस्फो’टित अभिनेत्री बिंदिया गोस्वामीसोबत लग्न केले. ते सुद्धा बिंदिया यांना पळवून नेत. बिंदिया जेपींपेक्षा 13 वर्षांनी लहान होत्या.
जेपी दत्ता यांनी 1976 साली ‘सरहद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. पण काही कारणास्तव त्यांचा हा पहिलाच चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकला नाही. याच पहिल्या चित्रपटाच्या सेटवर जेपी आणि बिंदिया यांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रे’म.
दीर्घ काळ एकमेकांना डे’ट केल्यानंतर 1985 साली दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण बिंदियांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. मग काय, बिंदिया यांनी घरून पळून जात जेपींशी लग्न केले. बिंदिया यांनी अभिनयक्षेत्र सोडले असले तरी त्यांनी जे.पी. दत्ता यांच्या काही चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले.
रिफ्यूजी, एलओसी कारगिल, उमराव जान यांसारख्या चित्रपटातील कलाकारांचे कपडे त्यांनी डिझाइन केले आहे. जे. पी दत्ता आणि बिंदिया यांनी १९८५ मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत.