विक्रम गोखले यांच्या नंतर मराठी मनोरंजन सृष्टीला आणखी एक मोठा धक्का ! दिगग्ज अभिनेत्याचं निधन..

विक्रम गोखले यांच्या नंतर मराठी मनोरंजन सृष्टीला आणखी एक मोठा धक्का ! दिगग्ज अभिनेत्याचं निधन..

नुकतच मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांचे निध’न झाले. दीर्घकाळ रुग्णालयात दाखल असताना ते अचानक कोमा मध्ये गेले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीमध्येही कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

मराठी तसेच हिंदीमध्येही विक्रम गोखले यांना मोठा मान होता. मराठी सिनेसृष्टीमध्ये त्यांनी मौलचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गज सुपरस्टारसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.गेल्या अनेक वर्षांपासून ते सिनेसृष्टीसोबत जोडले गेले होते. त्यांच्या निधनानंतर फक्त मराठीच नाही तर बॉलिवूड देखील हळहळले होते.

अनेक दिग्गज अभिनेते आणि कलाकारांनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक श्रद्धांजली वाहिली होती. दरम्यान याच दुःखातून सावरत असताना मराठी मनोरंजन सृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे गाजलेले नाटक. आज त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

मोहनदास सुखटणकर हे मुळचे गोव्याचे होते. ‘दि  गोवा हिंदू असोसिएशन’च्या माध्यमातून त्यांनी नाटकाला सुरुवात केली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’ ही नाटके तर ‘चांदणे शिंपीत जा’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘निवडुंग’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भुमिका केल्या. तर ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या काही मराठी मालिका. मात्र ते मालिकांमध्ये फारसे रमले नाहीत. त्यांनी नेहमीच रंगभुमीला प्राधान्य दिले. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा यामधुन लोकप्रिय झालेला विनोदी कलाकार समीर चौगुलेला त्यांनी घरी भेटायला बोलावले होते. ‘९३ वर्षांचा आहे रे तुला भेटायची इच्छा आहे, पण शक्य होत नाही, एकदा घरी भेटायला ये असे ते समीर ला म्हणाले होते.’ समीर ने त्यांच्या भेटीचा किस्सा सांगितला होता.

त्यांनी ४० हून अधिक नाटकांमध्ये काम केले. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ ही देखील त्यांची गाजलेली नाटके आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले होते त्यांच्याकडे बघूनच अनेक कलाकार घडले होते पण आज त्यांच्या जाण्याने आपल्या मराठी सृष्टीने एक उमदा कलाकार गमावला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12