वयाच्या 54 व्या वर्षी देखील खूपच हॉट आणि बोल्ड दिसते ‘ही’ अभिनेत्री, सलमानसोबत छापल्या होत्या लग्नाच्या पत्रिका, पहा फोटो..

बॉलीवूड फिल्म जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, ज्यांचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होत असतात. सध्याच्या काळात बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या सौंदर्याने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिचे वय आज ५४ वर्ष असून सुद्धा आज ही तिच्या समोर अनेक अभिनेत्र्यां फिक्या पडतातच. पण जिच्या प्रे’मात सलमान खान सुद्धा पार वेडा झाला होता. चला तर मग जाणून घेऊ कि कोण आहे ती अभिनेत्री.
आपल्याला माहित असेल कि बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे यात संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ व युलिया वंतूर यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्याचे प्रेमप्रकरण सगळ्यांच्याच चांगलेच परिचयाचे आहे. या सर्वांमध्ये संगीता जास्त खास आहे. कारण आजही सलमान तिला त्याच्या रियल लाईफची अभिनेत्री मानतो.
संगीता बिजलानीची मैत्री सलमान खानसोबत त्यावेळी झाली होती ज्यावेळी सलमान शाहीन जाफरी म्हणजेच सलमानची पहिली गर्लफ्रेंडला डेट करत होता. त्यावेळी संगीताचे ब्रेकअप झाले होते. म्हणून ती अपसेट होती. त्या दरम्यान सलमान व संगीता एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले होते.
ते दोघे सगळीकडे एकत्र वावरताना दिसू लागले होते. त्या दोघांच्या अफेयरच्या चर्चांना उधाण आले होते. चर्चा इथंपर्यंत आली होती की सलमान व संगीता बिजलानीचे लग्नाची तारीख देखील निश्चित झाली होती. इतकंच नाही तर निमंत्रण पत्रिकादेखील छापल्या होत्या.
जासिम खान यांचे पुस्तक बीइंग सलमानमध्ये या गोष्टीचा दावा करण्यात आला आहे की संगीताने एका मुलाखतीत तिच्या व सलमानचे लग्न ठरल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला होता. इतकेच नाही तर स्वतः सलमान खानने देखील संगीतासोबतच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकादेखील छापले असल्याचं सांगितलं होतं.
मात्र त्या दोघांचं लग्न संगीता व सलमानचे लग्नाच्या एक महिन्यांपू्र्वी तुटले होते. त्यावेळी असं वृत्त समोर आले की सलमान सोमी अलीला डेट करत होता त्यामुळे संगीताने त्याच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. हे वृत्त किती खरं आहे हे सलमान व संगीताला चांगलेच माहित आहे.
१४ नोव्हेंबर, १९९६ साली संगीताने क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केले होते. मात्र तिचे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि २०१० साली ती विभक्त झाली. सलमान व संगीता आजही खूप चांगले मित्र आहेत. संगीतानंतर सलमानचे कित्येक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते.
सर्वात जास्त ऐश्वर्यासोबतचे त्याचे अफेयर गाजले होते. मात्र नंतर ऐश्वर्यानेदेखील सलमानसोबतचे नाते तोडले आणि अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ५४ वर्षीय सलमान आजही सिंगल आहे. त्याचे चाहतेदेखील त्याच्या लग्नाचे वृत्त ऐकण्यासाठी उत्सुक आहे.