वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आई बनली होती बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पहा नंतर डायरेक्टशीच केले लग्न….

आज आपण अशा एक बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी आई बनली होती. ही अभिनेत्री आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. तर आज आपण बॉलीवूडमध्ये चांदणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेवूयात.
तर आम्ही बोलत आहोत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी बद्दल. जरी आज श्रीदेवी आपल्या सर्वांमध्ये नसली तरी तिच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम ताज्या राहतील. श्रीदेवी जितकी तिच्या चित्रपटांबद्दल चर्चेत राहिली आहे, तितकेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत राहिली आहे.
श्रीदेवीने बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपट जगतात पाऊल ठेवले होते आणि हळूहळू इंडस्ट्रीमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनया समोर नवीन अभिनेत्रीही फिक्या दिसतात.
वयाच्या 13 व्या वर्षी बनली आई:- श्रीदेवीची अभिनय करीयर खूप चमकदार राहिली आहे, पण श्रीदेवी अवघ्या 13 व्या वर्षी आई बनली होती हे फार कमी लोकांना माहिती असेल. खरे तर जेव्हा श्रीदेवी 13 वर्षांची होती तेव्हा तिला सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि ती गमावू इच्छित नव्हती.
म्हणून वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी ऑनस्क्रीनवर आईची भूमिका साकारण्यास नकार दिला नाही. आईच्या भूमिकेनंतर अभिनेत्री देखील त्याच अभिनेत्याची गर्लफ्रेंड झाली हा चित्रपट तमिळचा मूंद्रू मुडीचू होता. चित्रपट कारकीर्दीत तिने सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह सुमारे 20 चित्रपटांत काम केले. दोघेही खूप चांगले मित्र झाले होते.
रजनीकांतची सावत्र आईची भूमिका:- आश्चर्य म्हणजे जेव्हा श्रीदेवी जेव्हा ऑनस्क्रीन सावत्र आईची भूमिका केली तेव्हा रजनीकांत 25 वर्षांचे होते. या चित्रपटासाठी श्रीदेवीला रजनीकांतपेक्षा जास्त पैसे मिळाले होते.
त्यावेळी श्रीदेवीला 5000 रुपये आणि रजनीकांत यांना 2000 रुपये दिले गेले होते. त्याच वेळी, एक अतिशय मोठा अभिनेता समजल्या जाणार्या कमल हसनला 30 हजार रुपये देण्यात आले होते.
श्रीदेवीचे खरे नाव काय होते:- तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रीदेवीचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यप्पन (श्री अम्मा येंजर अय्यपान) होते. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांचे नाव श्रीदेवी झाले.
श्रीदेवी जेव्हा बॉलिवूडमध्ये आपले करीयर सुरू केले तेव्हा हिंदीमध्ये बोलणे तिला जमत नव्हते, त्यामुळे तिचा आवाज बहुते चित्रपटात डब केला जात होता. या व्यतिरिक्त तिचा आखरी रास्ता हा चित्रपट रेखाच्या आवाजात डब करण्यात आला होता.
श्रीदेवीने पहिल्यांदा चांदनी या चित्रपटात तिचा स्वताचा आवाज दिला. जरी श्रीदेवीच्या मागे अनेक कलाकार वेडे झाले होते परंतु बोनी कपूर यांना कोणत्याही परिस्थितीत श्रीदेवीला मिळवायचे होते. सुरुवातीला श्रीदेवीला बोनी कपूर फार आवडत नव्हते पण हळू हळू ते त्यांच्या मैत्रीच्या प्रेमात पडल्या. यानंतर 2 जून 1996 रोजी दोघांनी लग्न केले. असं म्हणतात की लग्नाआधी श्रीदेवीने पती बोनीला राखी बांधली होती.
आजही श्रीदेवी आपल्यामध्ये नसल्या तरी कोणत्याची कार्यक्रमात श्रीदेवींची आठवण निघताच बोनी कपूर भावूक होत असल्याचे दिसते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे.