वडील नाही म्हणून लोक बिनधास्त चुकीच्या जागी स्प’र्श करायचे, एकदा तर आईच्या थेट..’ भारतीने सांगितले कटू अनुभव..

कॉमेडियन भरती सिंग म्हणलं की, अगदी आपोआप आपल्या चेहऱ्यवर एक हसू उमटतं. गेली कित्येक वर्षे, भरती आपल्या हटके अशा विनोदी शैलीने प्रेक्षकांना भरभरून हसवत आहे. तिचा दिलखुलास अंदाज आणि खास विनोदी शैली यामुळे आज संपूर्ण जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. बॉडी-शेमीन्ग हा मुद्दा भारतीने अगदी प्रखरपणे मांडला.
त्यामुळे तिचा एक वेगळा असा चाहतावर्ग आहे, तिच्या व्यक्तिमत्वावर भाळला गेला आहे. कोणताही बॅकग्राऊंड नसल्यामुळं तिला चित्रपट सृष्टीमध्ये येण्यासाठी संघर्षच करावा लागला होता. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपल्याकडे समज आहे की, मुलीचे वजन जास्त म्हणजे तिच्याकडे त्यादृष्टीने तर कोणीच बघणार नाही. पण भारतीने सांगितलेल्या कटू आठवणींमधून समोर येत की, समाजातील जवळपास प्रत्येक महिलेला अश्या अनुभवाचा सामना करावाच लागतो.
नुकतंच भारतीने मनीष पॉलच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती आणि तिथेच तिने आपल्या या अनुभवांबद्दल सांगितलं. तसे तर भरती कायमच चर्चेत असते, मात्र या मुलाखतींनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बालपणी सहन कराव्या लागलेल्या त्रा’साचा आणि का’स्टिंग का’ऊचचा भी’षण अनुभव शेअर केला आहे.
‘लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून भारतीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आणि या पहिल्याच शोमधून तिने चांगलीच लोकप्रियता कमावली. भारतीने, मनिष पॉलच्या चॅट शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आलेल्या दुःखद अनुभवाबद्दल देखील सांगितले आहे. सुरुवातीला ती काही इव्हेंट आणि बाकी शोदेखील करत होती. शोमधील इव्हेंटमध्ये को-ऑर्डिनेटर तिला चुकीच्या पद्धतीने स्प’र्श करत असे.
केवळ चुकीच्या पद्धीतीने नाही तर चुकीच्या जागी देखील तिला स्प’र्श करत असे. याबद्दल बोलत असताना तिने सांगितले की, “अनेकवेळा इव्हेंटमध्ये को-ऑर्डिनेटर गैर’वर्तन करत असत. ते सर्व लोक मला चुकीच्या पद्धतीनं कधी समोर तर कधी मागच्या भागावर स्पर्श करत. मला समजतं होतं की, हे चुकीचं आहे. पण, हे तर माझ्या काकांसारखे आहेत असं म्हणत मी स्वतःची समजूत काढत असे.
माझ्या काकांसारखे असणारे हे, माझ्याशी काही चुकीचं वागणार नाहीत असं मला वाटतं होत. पण मी चुकीची होते. आता मला समजत आहे की, ते सर्वच किती चुकीचं होतं. मला वाटायचं हे सर्व ठीक नाहीये. पण मी खूप आधीच काम सुरु केलं आणि त्यावेळी मला तेवढी समज नव्हती. पण आता मी या सर्व गोष्टींना विरोध करू शकते.
आता मी बिनधास्त बोलू शकते, ‘काय चाललंय? काय पाहताय? बाहेर जा मला क’पडे बदलायचे आहेत.आज मी हे सर्व बोलू शकते. त्यावेळी मात्र परिस्थिती खूपच वेगळी होती. कोणालाच विरोध करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. शोच्या सेटवरील अश्या लोकांमुळे अनेक वेळा मी माझ्या आईसोबत शूटिंगला येत असे. मात्र एका व्यक्तीने थेट माझ्या आईच्या खांदयावर हात ठेवला आणि कमरेवर हात ठेवत बाजूला केले होते.
तो माझ्यासाठी खूपच भ’यंकर क्षण होता. भारती केवळ २ वर्षांची असताना तिचे वडील वारले होते. त्यामुळे तिच्या आईने मोठ्या संघर्षाने आपले कुटुंब सांभाळले होते. तेव्हा देखील तिच्या आईला असेच अनुभव येत असे आणि ते बघून भारतील दुःख होत असे. मात्र आईसोबत जेव्हा गैर’वर्तन करत असे तेव्हा एकदा तिने खूप परेशान होऊन एका व्यक्तीला थेट बोललं होत.
‘तुला लाज नाही का वाटत? मला नवरा नाहीये म्हणून काय झालं? मला मुलं आहेत आणि तुम्हाला असं वागताना लाज वाटत नाही का?’ भारतीच्या या अनुभवामुळे सेटवर वातावरण चांगलेच गं’भीर झाले होते. त्याचसोबत तिने सुरुवातीच्या काळात आलेल्या का’स्टिंग का’ऊचच्या अनुभवाबद्दल देखील सांगितलं. एका खूपच कटू अश्या ऑडिशनचा अनुभव सांगताना भारती म्हणाली.
‘ऑडिशनला जाण्याच्यापूर्वी मी माझ्या मैत्रीणीला म्हणाले जर मी १५ मिनिटात बाहेर नाही आले तर पोलिसांना फोन करुन बोलाव. मी ऑडिशन देण्यासाठी आत खोलीमध्ये गेले तेव्हा तिथे एक व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीने शॉर्ट आणि टीशर्ट परिधान केला होता. त्याचे हावभाव असे होते की, कोणत्याही मुलीला ते अन्कम्फर्टेबल केले असते. त्याने मला वेगळाच इशारा करत मी काय करते असे विचारले.
मी ऑडिशन दिले पण त्याच्या त्या हावभावांमुळे मला ते काम मिळूच नये अशी प्रार्थना मी करत होते. त्यानंतर घरी आले. मला त्या दिग्दर्शकाने फोन केला नाही. पण त्यानंतर मला लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती.’ सर्वाना खळखळून हसवणाऱ्या भरतीच्या आयुष्यात देखील असे कटू आणि दुःखद अनुभव आले असतील असं कधीच कोणाला वाटल नसेल.