लाईम लाईट पासून दूर असते मुकेश अंबानीची ‘मेहुणी’, पहा नीता अंबानीपेक्षाही दिसते सुंदर, पण ‘हे’ काम करून चालवावे लागते घर…

मुकेश अंबानी हे भारतामधील सर्वात श्री’मंत व्यक्ती आहेत. काही दिवसांपूर्वीच फोर्ब्स या जगविख्यात मासिकाने जगातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील अनेक लोकांचा समावेश आहे. यात मुकेश अंबानी यांनी देखील स्थान पटकावले आहे. मुकेश अंबानी आज सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत.
रिटेल मार्केट, पेट्रोल, कपडा यासह टेलिकॉम मार्केट यासह अनेक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांची पत्नी नीता अंबानी या देखील समाजकार्य सह इतर कार्यात देखील व्यस्त असतात. आयपीएलमध्ये त्या मुंबई इंडियन्सच्या मालकीण आहेत. तसेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून काही समाजकार्य देखील करण्यात येते. गरीब मुलांसाठी देखील या शाळेत काही योजना राबविण्यात येतात. याशिवाय नीता अंबानी इतर क्षेत्रात देखील काम करत असतात. मुकेश अंबानी यांचे मुले देखील या क्षेत्रातच कार्यरत आहेत. आकाश अंबानी व ईशा अंबानी हे देखील रिलायन्स मध्ये आपले कामकाज करत असतात.
ईशा अंबानी ही जिओ चेअर पर्सन असल्याचे सांगण्यात येते. आकाश अंबानी देखील जिओ मध्ये काम करतो. तसेच इतर रिलायन्सच्या कंपन्यामध्ये देखील त्याचा सहभाग असतो. तर मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी हा देखील गेल्या काही वर्षापासून रिलायन्स मध्ये कार्यरत आहेत. आज आम्ही आपल्याला मुकेश अंबानी यांची मेहुणी ‘ममता दलाल’ यांच्या बद्दल माहिती देणार आहोत.
‘ममता दलाल’ या लाईमलाईट पासून अतिशय दूर राहतात. ममता दलाल आणि नीता अंबानी यांच्या वडीलाचे नाव रवींद्र भाई दलाल आणि आईचे नाव पूर्णीमा दलाल असे होते. रवींद्रभाई यांना देखील चमक धमक ही अधिक आवडत नसल्याचे सांगण्यात येते. नीता अंबानी व ममता दलाल या शिक्षिका आहेत.
नीता अंबानी यांनी देखील लग्न होण्यापूर्वी चार वर्षे शिक्षिकेची नोकरी केल्याचे सांगण्यात येते. ममता दलाल या नीता अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रायमरी टीचर आहेत. याबाबत बोलताना ममता दलाल म्हणाल्या की, मी सचिन तेंडूलकर आणि शाहरुख खान यांच्या मुलांना देखील शिकवले आहे.
मात्र, ते केवळ सेलिब्रिटींचे मुलं आहेत, म्हणून मी त्यांना काही विशेष वागणूक दिली नाही. त्यांना देखील सामान्य विद्यार्थ्यांना सारखीच वागणूक दिली आहे. मला लाईम लाईट पासून दूर राहायला आवडते, असे देखील त्या म्हणाल्या. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या ड्रेस डिझायनिंग च्य त्या रोल मॉडेल असल्याचे देखील सांगण्यात येते.
काही दिवसापूर्वी नीता अंबानी यांच्या वर she walks she leads हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहे. यात ममता दलाल यांच्या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. नीता अंबानी यांच्यापेक्षा ममता या चार वर्ष लहान आहेत. असे असले तरी आपण अंबानी कुटुंबाशी संबंधित आहोत, असे त्या कधीही जाणवू देत नाहीत, असे त्यांना ओळखणारे सांगत असतात. एकूणच ममता दलाल यांच्या साधेपणाची च’र्चा ही सर्वत्र होत असते.