लग्नासाठी वेडी झालेल्या रेखाला करायचं होत मुलीसोबत लग्न! स्वतःच खुलासा करत म्हणाल्या; ‘पुरुषाशीच कशाला मुलीसोबत लग्न करून देखील आपण…’

लग्नासाठी वेडी झालेल्या रेखाला करायचं होत मुलीसोबत लग्न! स्वतःच खुलासा करत म्हणाल्या; ‘पुरुषाशीच कशाला मुलीसोबत लग्न करून देखील आपण…’

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे नाव घेतले की, अनेक अजरामर असे पात्र आपल्यासमोर उभे राहतात. त्यांनी आपल्या भल्या-मोठ्या कारकिर्दीमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या आहेत. रेखा यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अभिनेत्री रेखाची जादू 50 वर्षांपासून इंडस्ट्रीत कायम आहे.

बाल कलाकार म्हणून रेखा यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवास सुरु केला होता. मात्र आज वयाच्या ६७व्या वर्षी देखील त्या मनोरंजनसृष्टीमधे सक्रिय आहेत. रेखा यांनी कित्येक वर्ष बॉलीवूडवर राज्य केले आहे. आजही बॉलीवूडवर त्या अधिराज्य गाजवत आहेत. रेखाच सौंदर्य आज देखील चर्चेचा विषय ठरतो.

त्यांच्या सौंदर्यावरुन रेखाच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे. अनेक अभिनेत्रींसाठी रेखा आदर्श आहेत. बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून आज देखील रेखा चे नाव सर्वात पहिले येते. आजही रेखा या नावाची जादू कायम आहे. ‘रेखा’ यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता आणि आज देखील आहे.

रेखा या केवळ सर्वसाधारण लोकांच्याच नाही तर, अनेक सेलिब्रिटीजचं देखील ‘ड्रिमगर्ल’ होत्या. आपल्या प्रोफेशनल लाईफ साठी रेखा जितक्या प्रसिद्ध होत्या, तेवढ्यात जास्त त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील प्रसिद्ध ठरल्या. रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चांगलीच चर्चा रंगली.

मात्र त्यांचे नाव घेतले की अमिताभ बच्चन यांचाच चेहरा समोर. येतो बॉलिवूडमधील सर्वात रोमांटिक कपल म्हणून रेखा आणि अमिताभ यांचे आजही नाव घेतले जाते. परंतु रेखाच्या आयुष्यात केवळ अमिताभ बच्चनच नाही तर अनेक अभिनेते आले होते. विनोद मेहरा आणि रेखा यांचे प्रेम देखील त्यावेळी चांगलेच चर्चेत आले होते.

केवळ विनोद मेहरा आणि अमिताभ बच्चनच नाही तर जितेंद्र, किरण कुमार, मुकेश अग्रवाल, संजय दत्त आणि अक्षय कुमार सारख्या दिग्गजांसोबत देखील रेखाच्या नात्याच्या चर्चा अनेकवेळा रंगल्या आहेत. असं असलं तरीही रेखा मात्र आज एकटेपणाने आपले आयुष्य जगत आहेत. प्रेमात त्यांना हवी तशी साथ कोणत्याच खास व्यक्तीकडून मिळाली नाही.

आणि म्हणून आज देखील त्या एकट्या आहेत. एक काळ असा होता जेव्हा त्या लग्न करण्यासाठी तैयार होत्या. केवळ मुलासोबतच नाही तर मुलीसोबत देखील लग्न करण्यास रेखाने तैयारी दाखवली होती. याबद्दलचा एक व्हिडियो सध्या वायरल होत आहे. हा व्हिडियो सिमी गेरेवल यांनी घेतलेल्या मुलाखतीमधला आहे.

यावेळी सिमी रेखाला विचारतात, पुन्हा लग्न करण्यास तयार आहेत का? किंवा यावर त्यांनी कधी याबाबत विचार केला आहे का? यावर रेखा यांनी जे उत्तर दिले त्यामुळे सिमीला देखील धक्का बसला. लग्नाच्या प्रश्नावर रेखा यांनी दुसरा प्रश्न विचारला होता, ‘पुरुषाशी?’ यावर सिमीने हसून विचारलं की, ‘अजून काय? तू कोणत्याही मुलीशी लग्न करशील का?’ यावरही रेखाने पलटवार केला आणि म्हणाल्या की, ‘का नाही! मी मुलीशी लग्न का करू शकत नाही..’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12