लग्नानंतरही ‘या’ तरुण अभिनेत्रीचा प्रेमात आकंठ बुडाले होते राजेश खन्ना, डिंपलला घटस्फोट न देताच तिच्यासोबत….

रणवीर सिंग, वरून धवन, रणबिर कपूर, कार्तिक आर्यन सारख्या नव्या दमाच्या अभिनेत्यांची तरुणींमध्ये कमालीची क्रेझ आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक अभिनेते विवाहित असून देखील तरुणींमध्ये त्यांच्याबद्दलच आकर्षण बघायला मिळते. केवळ फॅन्स मध्येच नाही तर अभिनेत्रींमध्ये देखील या अभिनेत्यांबद्दल प्रेम बघायला मिळत आहे.
नुकताच कॉफी विथ करण मध्ये सारा अली खानने रणबीर कपूरसाठी आपल्या प्रेमाची कबुली दिली. तो विवाहित असला तरीही त्याच्यावरचं माझं प्रेम कमी झालं नाही, असं सारा अली खान बिनधास्तपणे बोलली. त्यानंतर सर्वांच्याच भुवया वर चढल्या. मात्र एखाद्या अभिनेत्रीने विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याची कबुली देण्याची ही काय पहिली वेळ नाही.
बॉलीवूडमध्ये अशा अनेक जोड्या आपण पाहिल्या आहेत. अनेक अभिनेते विवाहित असून देखील वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आणि नवीन नात्याची सुरुवात झाली. मात्र त्यापैकी काहीच नाते टिकून राहिले तर काही नाट्याचा शेवट अतिशय दुःखद असा पाहायला मिळाला.
अमिताभ बच्चन-रेखा, अक्षय कुमार-प्रियंका चोप्रा, गोविंदा-राणी मुखर्जी सारख्या काही अफेअरची चर्चा आज देखील बॉलीवूडमध्ये जोरदार रंगल्याचं बघायला मिळतं. अशाच नात्यांपैकी एक राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांचं नातं देखील होतं. त्याकाळी राजेश खन्ना यांची तरुणींमध्ये प्रचंड क्रेज होती.
अनेक तरुणींनी तर आपल्या रक्ताने त्यांना लव लेटर लिहून पाठवले होते. विशेष म्हणजे राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया सोबत लव्ह मॅरेज केलं. मात्र असं असलं तरीही टीना मुनीम सोबत असलेल त्यांचं नातं बॉलीवूडमध्ये चांगलेच चर्चेत आलं होतं. तसं तर राजेश खन्ना यांच्या अनेक अभिनेत्री सोबतची जोडी सुपरहिट ठरली.
मात्र टीना मुनीम आणि राजेश खन्ना यांच्या जोडीने एकाहून एक अशी अनेक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले. सुराग, सौतन, अलग अलग, आखिर क्यू, अधिकार यासारख्या सिनेमात टीना आणि राजेश खन्ना या दोघांची केमिस्ट्री रसिकांना बघायला मिळाली. सौतन चित्रपटाच्या वेळी दोघांमधील जवळीक अधिकच वाढली होती.
दोघांमधील मैत्रीची जागा प्रेमाने घेतली होती. टीना मुनीम आणि राजेश खन्ना हे दोघेही एकमेकांच्या नात्यांमध्ये खूप जास्त गंभीर होते. कित्येक काळ टीना राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह-इन मध्ये राहत असल्याच्या गप्पा देखील त्यावेळी रंगल्या होत्या. टीनाला राजेश खन्नाशी लग्न करायचे होते. बऱ्याच वेळा तीने राजेश खन्ना यांना आपल्या मनातील ही गोष्ट बोलून दाखवली.
मात्र राजेश खन्नानी या गोष्टीकडे कायम दुर्लक्ष केले. राजेश खन्नाच्या या वागण्याचा टीना मुनीमला सतत संताप येत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडलेले असून देखील उघडपणे एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्याची चोरी, टीना मुनीमला मान्य नव्हती. अखेर तिने त्यांच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. डिंपलला घटस्फोट देऊन टीना सोबत लग्न करण्याचे वचन राजेश यांनी तिला दिले.
मात्र या दरम्यान डिंपलला, आपण घटस्फोट देणार असल्याचं एकदाही राजेश खन्नानी बोलून दाखवलं नाही. वारंवार राजेश खन्ना कडून मिळालेल्या अशा कारणांमुळे टीना मुनीम पुरती खचली होती. त्यामुळेच तिने स्वतःला सावरत राजेश खन्ना सोबत दूर जाण्याचे ठरवले. आणि काही काळानंतर अनिल अंबानीच्या रूपात तिला खरं प्रेम मिळालं.