लग्नाच्या २२ वर्षांनी काजोलचा मोठा खुलासा, म्हणाली माझ्या वडिलांना लग्न मान्य नव्हते पण लग्नाआधीच मी अजय सोबत…

लग्नाच्या २२ वर्षांनी काजोलचा मोठा खुलासा, म्हणाली माझ्या वडिलांना लग्न मान्य नव्हते पण लग्नाआधीच मी अजय सोबत…

हिंदी सिनेमाच्या सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध जोडीमध्ये अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल याचे नाव घेतले जाते. या दोघांची जोडी चाहत्यांसह फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना देखील खूप आवडते. ९० च्या दशकातील अनेक अभिनेते आजही तितकेच प्रसिद्द आणि हि-ट आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अजय देवगण.

दोघांची जोडीही बरीच रंजक आहे. कारण असे की काजोल जिथे चुलबुली आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत असते तर अजय देवगणला कमी बोलायला आवडते आणि तो खूप गंभीरही आहे. चित्रपटांमधून अनेकदा गंभीर भूमिकांमध्ये दिसणारा अजय देवगण खऱ्या आयुष्यातही कुटुंबाच्या बाबतीत तितकाच गंभीर आहे.

बॉलिवूडमध्ये फॅमिली मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजय देवगणचं नाव घेतलं जाते. खरेतर चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यानंतर या चित्रपटाच्या सेटवरच दोघांमधील प्रे’म वाढू लागले. नंतर दोघांनी लग्न करण्याचे ठरवले.

अजय आणि काजोलच्या लग्नाला 21 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. वर्ष १९९९ मध्ये अजय आणि काजोल यांनी सात फेरे घेतले. पण काजोलचे वडील या नात्यावर खुश नव्हते. ते दोघांच्या लग्नाविरूद्ध होते. काजोलने स्वत: एका मुलाखतीच्या वेळी हा एक मोठा खुलासा केला.

वास्तविक जीवनात अजय आणि काजोलची जोडी खूपच पसंत केली जाते. पडद्यावरही चाहत्यांना ही जोडी खूपच आवडली आहे आणि या जोडीला चाहत्यांनी बरेच प्रेम दिले आहे. त्यांना दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी मोठी आहे, मुलीचे नाव न्यासा आहे तर लहान मुलाचे नाव युग आहे.

काजोल आणि अजय त्यांच्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहेत. पण एक काळ असा होता की काजोलच्या वडिलांनी अजयसोबत काजोलचे लग्न मान्य केले नव्हते. काजोलने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आणि सांगितले की तिचे वडील शोमु मुखर्जी यांना 24 वर्षांच्या तरुण वयातच मी अजयशी लग्न करणे मान्य नव्हते.

असे म्हणतात की काजोलच्या वडिलांना काजोलने अजयशी लग्न करण्यास काही हरकत नव्हती, परंतु त्याऐवजी काजोलला लवकर लग्न करताना पहाण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्या मुलीने लवकर लग्न न करावे अशी त्यांची इच्छा होती, उलट तिने या चित्रपट उद्योगात अधिक काम केले पाहिजे असे तिच्या वडिलांना वाटत होते.

पण दुसरीकडे, काजोलची आ’ई आणि तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांना यावर काहीही हरकत नव्हती. या कामात त्यांनी आपल्या मुलीचे समर्थन केले. काजोलने मुलाखतीत सांगितले होते की, मम् त्या वेळी म्हणाली की तू तुझ्या मनाचे ऐक.

त्याच वेळी, अजय आणि काजोल एकमेकांना खूपच पसंत करत होते. दोघांनाही लवकरात लवकर लग्न करायचे होते. अखेर अजय आणि काजोलने 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केले. लवकरच या दोघांच्या लग्नाला २३ वर्षे यशस्वी होणार आहेत.

विशेष म्हणजे अजय देवगन आणि काजोलची जोडी चित्रपटाच्या पडद्यावर बर्‍यापैकी हि-ट ठरली आहे. दोघांची जोडी राजू चाचा, इश्क, तू मी और हम, तन्हाजी मध्ये आपण बघितली आहे. शेवटच्या वेळी दोघांना तान्हाजी चित्रपटात एकत्र पाहिले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12