लग्नाच्या इतक्या वर्षांनी पद्मिनी कोल्हापुेरे यांनी केला ध’क्कादायक खुलासा, म्हणाल्या हा ‘सूड’ घेण्यासाठी पतीसोबत केलं लग्न…

अभिनेत्री “पद्मिनी कोल्हापुरे” यांनी अगदी बालपणातच अभिनयाच्या करकीर्दीला सुरुवात केली होती. प्रेम रोग, गहराई, सत्यम शिवम सुंदरम, जिंदगी, वो ७ दिन, सौतन, इन्साफ का तराजू अशा अनेक हिट चित्रपटातून त्यांनी नायिकेची भूमिका बजावली होती. ऋषी कपूर, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती या बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांनी चित्रपटातून काम केले.

हिंदी सृष्टीत नाव लौकिक केलेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी पुढे जाऊन मराठी सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पद्मिनी कोल्हापूरे हीने फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री ठरली. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध चित्रपटात काम करून पद्मिनी कोल्हापूरे यांनी चाहत्यांच्या मनात आपलं अस्तित्व सिद्ध करून जागा मिळवली होती.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा निखळ निरागसपणा, आकर्षकता आणि तीच घायाळ करून सोडणार सौंदर्य यामुळे 80 च्या दशकात त्यांनी त्यांचं वेगळंच अस्तित्व समोर आणलं होतं. हे सर्व असून देखील पद्मिनी कोल्हारपूरे या अभिनयाच्या क्षेत्रात चुकूनच आल्या होत्या. खर तर अभिनयात येणे हे पद्मिनी कोल्हापूरे यांनी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं.

आपल्या आत्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गायनातील जादू बघून त्यांनाही गायन क्षेत्रात उडी मारण्याची इच्छा होती. आपल्या आत्यानप्रमाणे त्यांनाही गायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी अंगिकारल होतं. पण केवळ आपलं नशीब आजमावायचं म्हणून त्या सिनेमात आल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात चित्रपट आणि अभिनय यांच्याशी त्यांचं एक अढळ नात बनलं आणि गायनात नाही तर अभिनयात त्यांचा चांगलाच जम बसला.

त्यानंतर पद्मिनी कोल्हापुरे यांनी चित्रपट निर्माते टूटू शर्मा यांचेसोबत लग्न करत आपला संसार थाटला. एकदा कपिल शर्मा यांच्या शोमध्ये पद्मिनी यांनी देखील हजेरी लावली होती. या शो मध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला होता. त्यावेळी कपिल शर्मा यांनी पद्मिनी यांना एक प्रश्न विचारला की, टूटू शर्मा उर्फ प्रदीप शर्मा यांनी तुम्हाला पेमेंटच दिले नव्हते.

यावर पद्मिनी कोल्हापूरे यांनी हसतच उत्तर दिले होते की, म्हणूनच तर मी त्यांच्यासोबतच लग्न केलं आणि मी त्याच गोष्टीचा सूड घेतलाय. त्यावेळी शो मधील प्रेक्षकांच्या मध्ये हास्य कल्लोळ उडाला होता. पद्मिनी कोल्हापुरे आणि टुट्टू शर्मा यांनी भेट 1986 मध्ये ‘ऐसा प्यार कहा’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांनाच समजले नाही.

त्यांनी नंतर लग्न करण्याचे ठरवले होते. परंतु पद्मिनी कोल्हापुरे यांच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. दोघेही एकाच धर्मातील नसल्याने कुटुंबाचा या लग्नासाठी विरोध प्रखड विरोध होता. त्यानंतर दोघांनीही पद्मिनीच्या कुटुंबीयांना बरेचदा समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु कुटुंबीय कोणत्याही अटीवर या लग्नास तयार झाले नव्हते.

शेवटी एकेदिवशी पद्मिनी टुट्टू उर्फ प्रदीप शर्मा सोबत पळून गेली आणि 14 ऑगस्ट 1986 ला त्या दोघांनीही लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील आहे आणि त्याचे नाव प्रियांक असे आहे. वर सांगितल्या प्रमाणेच पद्मिनी कोल्हापुरे यांना अभिनयाची नाही तर गाण्याची फार आवड होती. परंतु त्यांच्या आजीची इच्छा होती की पद्मिनी यांनी गायिका नव्हे तर अभिनेत्री व्हावे.

आज्जीच्या इच्छाखातर त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या आणि त्यांनी वयाच्या अवघ्या 17 ते 18 वर्षाची असतानेच आईची भूमिका साकारली होती. ज्या वयात आईपण काय असते याची जाणीव नव्हती त्याच काळात त्यांनी ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका निभावणं नक्कीच त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान होते.

1974 मध्ये एक खिलाडी बावन पत्ते सिनेमातून पद्मिनी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसे तर वयाच्या 9 व्या वर्षीच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पुढे अभिनेत्री म्हणून त्या नावारुपाला आल्या. आजही पद्मिनी कोल्हापुरे यांची जादू कायम आहे. पद्मिनी कोल्हापुरे या बालपणीपासून अभिनय करत आल्या आहेत.

सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यांचे ‘यशोमती मय्या से’ हे सदाबहार गाणे आजही अनेकांच्या स्मरणात आहे. ‘जमाने को दिखाना है’, ‘वो सात दिन’, ‘अनुभव’ हे त्यांचे सिनेमे ८० च्या दशकात चांगलेच गाजले. त्यानंतर 2013 साली ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमात शाहीद कपूरच्या आईच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. तसेच मंथन या मराठी सिनेमातही त्यांची प्रमुख भूमिका होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12