लग्नाच्याच रात्री ‘या’ अभिनेत्रीकडून झाली होती मोठी चूक, म्हणाली; ‘ मी दा’रूच्या न’शेत नवऱ्याचा..’

‘घो मला असा हवा’ या चित्रपटातून मराठी कला विश्वामध्ये राधिका आपटेने पदार्पण केले. या चित्रपटाने म्हणावे तेवढे यश संपादन नाही केले परंतु राधिकाच्या अभिनयाचे सगळीकडूनच खास कौतुक झाले. त्यानंतर राधिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक दाक्षिणात्य आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली.
राधिकाने अनेक वेब सिरीज मध्ये देखील काम केले आहे. त्यामुळे आज राधिकाला जागतिक स्तरावरती एक खास ओळख मिळाली आहे. राधिका आपटेने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत राधिकाने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
राधिकाला ओटीटी प्लॅटफॉर्मची क्वीन देखील म्हटले जाते. तिने आपल्या कामगिरीने केवळ चाहत्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. आपल्या अभिनयाने राधिका प्रत्येक पात्राला जिवंत करते. त्यामुळेच राधिका आपटेला मनोरंजनसृष्टीमधे एक खास जागा आहे. राधिका आपटे कायम आपल्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
अनेकवेळा तिने आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आणि आता पुन्हा एकदा राधिकाने असाच एक खुलासा केला आहे. राधिका पडद्यावर जितकी बोल्ड दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यातही जास्त बोल्ड आहे. एका मुलाखतीमध्ये स्वतः राधिकाने तिच्या लग्नाशी संबंधित एक अतिशय रंजक गोष्टीचा खुलासा केला आहे.
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. वर्षभरानंतर त्याने आपल्या लग्नाचा खुलासा केला. होय, राधिकाने 2012 मध्ये लाइमलाइटपासून दूर लग्न केले आणि 2013 मध्ये अधिकृतपणे सांगितले. राधिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्याकडे लग्नाचा कोणताही फोटो नाही.
एका मुलाखतीत राधिकाने सांगितले की, 10 वर्षांपूर्वी बेनेडिक्ट आणि माझे लग्न झाले तेव्हा आम्ही फोटो क्लिक करायला विसरलो होतो. आमचे लग्न खूप प्रायव्हेट होते. विशेष म्हणजे आमच्या लग्नात, आम्ही आमच्या मित्रांना बोलावले होते आणि जेवण स्वतः बनवले होते.
आम्ही उत्तर इंग्लंडमध्ये लग्न आणि पार्टी केली होती परंतु आमचे अर्ध्याहून अधिक मित्र फोटोग्राफर असूनही आम्ही कोणतेही फोटो क्लिक केले नाहीत. कोणीही फोटो क्लिक केले नाही. राधिका पुढे म्हणाली की, आम्ही सर्व न’शेत होतो त्यामुळे आमच्याकडे लग्नाचे कोणतेही फोटोज नाहीत.
माझे पती खूप वाईट आहेत, त्यांना एकही फोटो क्लिक करावा वाटत नाही. पण आता यात देखील बराच बदल झाला आहे. म्हणून तर जेव्हा आम्ही सुट्टीवर जातो तेव्हा नक्कीच काही फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतो.