लग्नाचे 7 वर्षानंतर करीनाने लग्नापूर्वीचा एक किस्सा केला उघड, म्हणाली लग्नाआधी सैफने मला दोन वेळा…

लग्नाचे 7 वर्षानंतर करीनाने लग्नापूर्वीचा एक किस्सा केला उघड, म्हणाली लग्नाआधी सैफने मला दोन वेळा…

करीना कपूर आणि सैफ अली खान हे दोघे बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. दोघेही प्रत्येक ठिकाणी सोबतच असतात. यांना मुलगा देखील झाला. सैफ आणि करिनाच्या मुलाचे नाव तैमुर अली खान असे आहे. दोघांनीही जवळपास सात वर्षांपूर्वी लग्न केले होते.

सैफ अली खानची करीना दुसरी पत्नी असून त्या अगोदर सैफ अली खान ने अमृता सिंग बरोबर विवाह केला होता. कौटुंबिक वादातून सैफ अली खान आणि अमृता यांचे मधील विवाह विच्छेदन झाला होता. त्यानंतर सैफ ने करीना सोबत लग्न केले. परंतु करीना सोबत लग्न होण्यापूर्वी सैफ ने काय केले होते याचा खुलासा आज आपण बघणार आहोत.

काही कारणाने दोघांनी एकमेकांपासून तलाक घेतला सैफ आणि अमृता यांना दोन मुले देखील आहेत. सैफ आणि अमृता यांची कन्या सारा अली खान बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमधून आपला जलवा दाखवताना दिसते. अमृता बरोबर तलाक घेतल्यानंतर सैफने करीना कपूर सोबत लग्न केले. बॉलीवुड मधील अप्सरा असलेली करीना इतक्या सहजासहजी सैफला मिळाली नाही. सैफ अली खान ने जवळपास दोनदा करीना कपूरला प्र-पोज केला होता.

यादरम्यानच एका इंटरव्यू मध्ये करीनाने हे उघड केले आहे की सैफ अली खान ने मला दोनदा लग्नासाठी विचारणा केली होती. परंतु या प्र-पोज वर किंवा लग्नासाठी विचारल्यावर करीना कपूर लगेच राजी झाली नव्हती. इंटरव्यू मध्ये करीनाने असे सांगितले होते की, ” आम्ही ग्रीसमध्ये “टशन” या चित्रपटाची शूटिंग करत होतो, तेव्हा सैफ अली खान पहिल्यांदा या विषयावर करीनाशी बोलले होते.

सैफ अली खानने असे म्हटले होते की, “करीना मला वाटते आपण आता लग्न करायला हवे. पुढे करीनाने असे देखील सांगितले की सैफ अली खान ने मला ग्रीस आणि लडाख या दोन्ही ठिकाणी यासंदर्भात विचारले होते. करीनाने यावर असे म्हटले होते की मी तुला चांगल्या प्रकारे अजून ओळखत नाही, किंवा मी सैफला आणखीन चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छित होते.

करीनाला इंटरव्यू मध्ये आणखी एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे प्रे-ग्नेंसी आणि आई बनल्यानंतर देखील काम सुरू ठेवले यावर सैफ चे काय मत होते? यावर करीनाने असे उत्तर दिले की माझ्या फिल्मी आयुष्यापेक्षा माझे खाजगी आयुष्य खूप वेगळे आहे. मी सैफला अगोदरच सांगून टाकले होते की मी कधीही काम करणे सोडणार नाही.

यावर सैफ अली खान ने असे सांगितले होते की हे तुझे आयुष्य आहे तुला जसे जगायचे तसे जग, तुझ्या करिअर बद्दलचा सर्व निर्णय तूच घ्यायला हवा असे असे सैफने करीनाला सांगितले होते. सैफ अली खान आणि करीना कपूर बॉलिवूडमधील खूपच सुंदर जोडी पैकी एक आहे दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत असते. दोघांचा मुलगा तैमुर अली खान सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतो. त्याची काही क्युट से फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.