लग्नाआधीच मुलांची प्लॅनिंग करताय बॉलिवूडचं ‘हे’ हॉट कपल, म्हणाले; लग्नाआधी मुलं असतील तर..

बॉलीवूडमध्ये अनेक अशा जोड्या पाहिलेल्या आहेत की ज्या लग्नाच्या आधीच चर्चेत असतात. आता एक जोडी चर्चेत आलेली आहे. ही जोडी लग्नाच्या आधीच मुलांचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सोशल मीडियावर खूप मोठी चर्चा रंगली आहे.
याआधी देखील आपल्याला काही वर्षापूर्वी कमल हसन आणि सारिका यांनीदेखील लग्नाच्या आधीच मुलगी जन्माला घातली. त्यामुळे देखील त्यांची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच बॉलिवुडमध्ये स’रोगसीचे प्रमाणदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या माध्यमातूनही अनेक जण लग्न न करताच मुलांना जन्माला घालत आहेत.
यामध्ये करण जोहर, तुषार कपूर यांच्यासारख्या अभिनेत्याचे नाव आपल्याला घेता येतील. बिग बॉस हा शो प्रचंड गाजलेला आहे. बिग बॉसचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान याने केलेले आहे. बिग बॉस आतापर्यंत 15 सेशनमध्ये आलेले दिसले आहे. आता देखील बिग बॉस मध्ये सहभागी झालेला अभिनेता चर्चेत आलेला आहे.
या अभिनेत्याचे नाव तेजस्वी प्रकाश आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे खूप च’र्चेत आहेत. पहिल्या दिवसापासून शोमध्ये हे लव्हबर्ड्स म्हणून सोशल मीडियावर च’र्चेत आले होते. तेजस्विनी ही नागिन 6 या शोमध्ये सध्या व्यस्त आहे, असे असले तरी ही करणच्या सोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
दोघंही एकमेकांसाठी प्रचंड वेळ काढत असतात आणि दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. त्यांच्या या फोटोला देखील अनेक जण लाईक करत असतात. सध्या या दोघांच्या लग्नाच्या चर्चादेखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र अजून तरी या दोघांनी दुजोरा दिला नाही.
मात्र त्याबाबत दुसरेच एक वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे. करण काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, मला एक मुलगी हवी आहे. पण तेजस्वीला पंचवीस मुलं हवी आहेत. माझ्या बहिणीची मुले आणि माझं फार चांगलं नातं आहे. त्यामुळे माझ्या मुलांचा मी उत्तम सांभाळ करू शकतो, असे देखील करण म्हणाला होता.
त्यामुळे करण आणि तेजस्वी बद्दल एकच चर्चा रंगली आहे. काही दिवसापूर्वीच करण कुंद्रा हा आपल्या कुटुंबासह तेजस्वीच्या घरी गेला होता. यावेळेस या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये खूप मोठी चर्चा रंगली होती. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे.
तेजस्वी प्रकाशच्या आई-वडिलांचा लग्नाच्या वाढदिवसाला करण कुंद्रा हा त्याच्या आई वडिलांसोबत पोहोचला होता. या सर्वांनी मिळून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा मोठ्या थाटात साजरा केला होता. लग्नाच्या आधीच करण याने एक वक्तव्य केले आहे. ते सध्या तुफान चर्चेत आहे.
लग्ना आधीच दोघांनीही मुलांची देखील प्लॅनिंग केली आहे. मुलाखतीत कारण म्हणाला होता की, मला तेजस्वी कडून एक मुलगी हवी आहे आणि मला माहिती आहे की मी एक उत्तम वडील होऊ शकतो. त्यामुळे आता लग्नाच्या आधीच त्याने अशी अपेक्षा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.