‘लगान’मधील ‘गोरी मेम’ वयाच्या 52व्या वर्षी दिसते सुपर हॉट आणि ग्लॅमर्स, पहा 20 वर्षानंतर दिसते अशी…

‘लगान’मधील ‘गोरी मेम’ वयाच्या 52व्या वर्षी दिसते सुपर हॉट आणि ग्लॅमर्स, पहा 20 वर्षानंतर दिसते अशी…

नुकतंच साऊथच्या सुपरस्टार सूर्याच्या ‘जय भीम’ या सिनेमाने थेट ऑस्करमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे सगळीकडेच या सिनेमाचे तों डभरून कौतुक होत आहे. यामुळे आता पुन्हा एकदा आपल्या देशामधून ऑस्कर पुरस्कारासाठी गेलेल्या सिनेमांची च र्चा सुरु झाली आहे. ऑस्कर पुरस्करसाठी सिनेमाबद्दल बोललं तर, आमीर खानच्या लगान सिनेमाचा खास उल्लेख करायलाच हवा.

लगान सिनेमा अजून देखील अनेकजण खूप आवडीने बघतात. आमिर खानच्या लगान सिनेमाने त्यावेळी चांगलीच धूम केली होती. लगान सिनेमाने अनेक नवीन विक्रम आपल्या नावे केला होता. या सिनेमातील सर्वच भूमिका खूप जास्त लोकप्रिय ठरल्या होत्या. अशाच खास भूमिकांपैकी एक भूमिका होती गोरी मेमची.

या आमीरच्या गोरी मेमने आमिरला आणि त्याच्या टिमला क्रिकेट मॅच जिंकता यावी यासाठी मदत केली होती. आज देखील तिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. आता या सिनेमाला जवळपास २० वर्ष झाले आहेत. आमीर खान आता कसा दिसतो हे तर आपल्याला माहीतच आहे. सोबत इतर कलाकारांचे देखील अधून मधून फोटो समोर येतच असतात.

मात्र २० वर्षानंतर आमीरची गोरी मेम कशी दिसते हे तुम्हाला माहित आहे का? इंग्रज तरूणीच्या या भूमिकेचं नाव ‘एलिजाबेथ रसेल’ असं होत. रशेल शॅले या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली होती. तिचे पात्र आज देखील अनेकांच्या मनात जिवंत आहे. तिची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र असं असलं तरीही बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री नंतर पुन्हा दिसली नाही.

आता ती कशी दिसत असेल हेसुद्धा अनेकांना माहीत नाही. मात्र आता तिचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. आणि हेच फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत. तिच्या इन्स्टाग्रामच्या फॅन पेजवर रशेलचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तिचे फॅन्स या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

तिच्या या फोटोंवरून तिच्या वयाचा अंदाज लावणं अजिबातच सोपं नाही, असंच सगळेजण बोलत आहेत. अनेकांनी तिच्या ‘लगान’मधील कामाचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. पुन्हा एकदा तिला हिंदी सिनेमामध्ये बघायला आवडेल अस देखील अनेकांनी तिच्या कमेंट बॉक्समध्ये लिहले आहे.

इंस्टाग्रामवर रशेलचे वेगवेगळे फॅन पेज असले तरीही, तिचं अजून देखील ऑफिशिअल इंन्स्टाग्राम पेज नाहीये. म्हणूनच तर ती सो’शल मी’डियापासून दूर राहते हे समजते. रशेल एक मॉडल आणि रायटर देखील आहे. ‘द एल वर्ड’ सीरिजमध्ये तिने हेलेना पीबॉडीची भूमिका साकारली होती. हेलेना पिबॉडीची भूमिका देखील चांगलीच लोकप्रिय ठरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12