लक्ष्याची पोरगी स्वानंदी बेर्डे पडली प्रे’मात ! जाणून घ्या कोण आहे ‘तो’?

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. ब-याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. सध्या स्वानंदीची एक पोस्ट चर्चेत आहे.
होय, ही पोस्ट पाहिल्यानंतर स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला, असे मानले जात आहे. फोटोच्या कॅप्शनने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. तसेच आपल्याला माहित असेल कि सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे, शर्मिष्ठा राऊत यांच्या पाठोपाठ आता अभिनेता अस्ताद काळे देखील लग्न बंधनात अडकणार आहे.
दरम्यान दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी देखील प्रे’मात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी ही सतत चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो सध्या चर्चेत असून स्वानंदी प्रे’मात आहे की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि प्रेम मोदी असे या फोटोतील तरूणाचे नाव आहे. या तरूणासोबत स्वानंदीने अतिशय स्टाईलिश पोज दिल्या आहेत. शिवाय कॅप्शन तर असे आहे की, सध्या त्याचीच चर्चा आहे.
तुझ्या चेह-यावरचे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की इकटीला भिती वाटते आहे. खुप प्रे’म…,’ असे या पोस्टसोबत स्वानंदीने लिहिले आहे. तसेच तिच्या या पोस्टला प्रेम मोदीनेही साजेसे उत्तर दिले आहे.
त्याने ही स्वानंदीसोबतचा सेम फोटो शेअर करत, आपले प्रे’म व्यक्त केले आहे. हा फोटो आपल्या मैत्रीचे दर्शक आहे. आयुष्याच्या कठीण काळात तू माझा हात धरलास, माझ्या विनोदांवर खळखळून हसलीस. ही वेडी मुलगी माझ्या आयुष्याची ताकद आहे. तुला वाटते, त्यापेक्षा अधिक मी तुझ्यावर प्रेम करतो.
माझ्या द्विअर्थी विनोदांवर हसण्यासाठी आणि माझ्यावर अस्सीम प्रेम करण्यासाठी तुझे आभार… असे त्याने लिहिले आहे. यावरून तरी असेच दिसते आहे कि हे दोघे एकमेकांच्या प्रे’मात बुडाले आहेत. पण येणारी वेळ आणि काळच ठरवेल कि या दोघांमध्ये नेमके काय चालले आहे.
पण आपण अशा करू कि या दोघांचे प्रे’म असेच टिकून राहो आणि त्याचे येणारे भविष्य हे उज्वल आणि आनंदी असो. तसेच आपणास सांगू इच्छितो कि आपल्या आ’ई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा अभिनयाच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरचं ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.