रोगप्रतिकारशक्ती होईल कमी, जर करत असाल ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, वेळीच सावध व्हा, नाहीतर…

रोगप्रतिकारशक्ती होईल कमी, जर करत असाल ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, वेळीच सावध व्हा, नाहीतर…

कोणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेताना दिसत आहे. प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता विटामिन सी च्या गोळ्या घेताना दिसत आहे. प्रत्येकाला असं वाटत आहे की आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली व्हावी जेणेकरून जर आपल्याला कोरणा वगैरे झाला तर आपण त्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.

दरम्यान, यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारचा काढा तयार करून त्याचे सेवन करत आहेत पण हा काढा जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याचे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होताना दिसत आहेत.

अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर प्रत्येकजण भर देताना दिसत आहे पण पावसाळ्यात आपण आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेतली पाहिजे, आज आपण त्या मुद्द्यावरच बोलणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोरोनाशी दोन हात करू शकता. मात्र, पावसाळ्यात काही चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली दिसून येते. अहारातील चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना व्हायरसला तोंड देणे अवघड होऊ शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यास कारणीभूत असलेल्या घटकांबाबत जाणून घेवूयात…

हे लक्षात ठेवा

1 पालेभाज्या : पावसाळ्यात दुषित पाण्यातील भाज्यांचे सेवन केल्याने रोगराई पसरण्याचा धोका असतो. यासाठी पालेभाज्या गरम पाण्याने किंवा मीठाच्या पाण्याने चांगल्या धुवून स्वच्छ करा

2 मांसाहार : पावसाळ्यात समुद्रातील मासे खाणं टाळा. या दिवसात माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे माश्यांचे सेवन केल्याने वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. फ्रेश आणि चांगले शिजलेले मास खा.

3 तेलकट पदार्थ :
तेलकट पदार्थाचे सेवन टाळा. पावसाळ्यात अनेक घरांमध्ये तेलकट पदार्थ तयार केले जातात. यामुळे पचनक्रिया संथ गतीने होते.

4 बाहेरील पदार्थ :बाहेरील पदार्थ खाल्लयाने पोटाचे विकार उद्भवू शकतात. तसेच संसर्ग सुद्धा होऊ शकतो. म्हणून बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. फळांचे सेवन करा. पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12