रेल्वे स्टेशनवर भेळ विकणाऱ्या महिलेमध्ये असेही टलेंट, इन्स्टाग्राम रिल्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.. पहा Video

रेल्वे स्टेशनवर भेळ विकणाऱ्या महिलेमध्ये असेही टलेंट, इन्स्टाग्राम रिल्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.. पहा Video

सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जो अगदी सहजपणे सर्वसामान्यांसमोर उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक जण आपल्या वेगवेगळ्या कला दाखवत असतात. सोशल मीडिया वरती रोज अनेक व्हिडिओज अपलोड होत असतात. त्यापैकी कधी कोणता व्हिडिओ सुपरहिट ठरेल याचा काही नेम नाही.

अचानकच कोणतीतरी ट्रेंड येते आणि त्या माध्यमातून अनेक जण प्रकाश झोतात येतात. डान्स आणि गायनाचे तर रोज अनेक व्हिडिओज सोशल मीडिया वरती अपलोड होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालत आहे. अगदी सर्वसामान्य दिसणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती चर्चेचा विषय ठरत आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्म वरती भेळपुरी विकून स्वतःचे पोट भरणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ instagram वरती सध्या ट्रेडिंग वर आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून या मावशी आता चांगल्याच लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा उत्तम पैलू आता पुन्हा एकदा सर्वांसमोर येत आहे. इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियाचा प्रभाव मागील काही वर्षांमध्ये खूप जास्त वाढला आहे.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच स्तरातील व्यक्ती अगदी सर्रासपणे सोशल मीडियाचा वापर करत असतात. एकमेकांसोबत सतत कनेक्ट राहण्याकरिता आणि मनोरंजन म्हणून देखील इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक युट्युब यासारख्या माध्यमांचा वापर करण्याचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये सर्वच स्तरातील व्यक्ती अग्रेसर आहेत.

आपल्या घरांमध्ये काम करायला येणाऱ्या मावशी रोजंदारीवर काम करणारे ते मोठ मोठ्या लेखक पण यामध्ये वरिष्ठ पदांवर असणारे अधिकारी देखील सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यातच आता इंस्टाग्रामच्या रिल्सने अनेकांना भुरळ घातली आहे. तरुणाई मध्ये याचे प्रचंड वेड बघायला मिळत आहे.

या instagram रिल्स च्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य व्यक्ती चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. असंच काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर भेळपुरी विकणाऱ्या संगीता गायकवाड यांच्या बाबतीत देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी ही तरुणी रिल्स बनवून सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालत आहे.

या तरुणीचे रिल्स युजर्सला चांगलेच आवडत आहेत. अनेकजण तिचे तोंड भरून कौतुक देखील करत आहेत. संगीता गायकवाड 123 असे या instagram अकाउंटचे नाव आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सदर महिला आपल्या कानात हेडफोन्स लावून बॉलीवूडच्या, ‘बनके दिवाना मेरा पीछा ना कर,’ या गाण्यावर उत्तम हावभाव देत रील बनवत आहे.

स्टेशनवर असणाऱ्या एका बाकड्यावर बसून तिने आपल्यासमोर भेळपुरीची टोपली ठेवलेली आहे. निळ्या रंगाची साडी, हातात बांगड्या अशा पारंपारिक वेशात असलेली तरुनी अगदी मन लावून रील बनवत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत चार लाख जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अनेकांनी तिच्या व्हिडिओचे कौतुक करत हे देखील एक प्रकारचे टॅलेंट आहे असे म्हटले आहे. कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढत आपली आवड जपत ही महिला स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत असावी असे म्हणत अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.