रेखाच्या ‘या’ एका चुकीमुळे तिच्या पहिल्या पतीने लग्नाच्या 7 महिन्यानंतरच संपविले होते स्वतःचे जीवन..

रेखाच्या ‘या’ एका चुकीमुळे तिच्या पहिल्या पतीने लग्नाच्या 7 महिन्यानंतरच संपविले होते स्वतःचे जीवन..

बॉलिवूड अभिनेत्री रेखा त्या काळातली सुंदर अभिनेत्री होती, अगदी वयाच्या 63 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्याला तोड नाही. कितीतरी अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण रेखाच्या सौंदर्याशी कोणालाही स्पर्धा करता आली नाही. जसे जसे रेखाचे वय वाढत गेले तसे तसे तिचे सौंदर्यही वाढत गेले. रेखाच्या चित्रपटातील “इन आखों की मस्ती के मस्ताने हजारो हैं” हे गाणे लोकांना खूप आवडले होते.

आपल्या जलवाने रेखाने लाखो चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते. तिच्या फिल्मी करिअरपेक्षा रेखा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वात जास्त चर्चेत राहिली. रेखाचे नाव कधी बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन तर कधी विनोद मेहरा यांच्याशी जोडले गेले आहे.

उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले :
1990 मध्ये रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही महिन्यांनंतर रेखा आणि मुकेश यांच्यात दुरावा आला. रेखा तिच्या या लग्नाला कंटाळली होती ज्यामुळे ती आपल्या पतीपासून दूर राहू लागली. मुकेशने रेखासोबत सुखी संसार करण्याचा खूप प्रयत्न केला पण रेखाने मुकेशला हवा तितका प्रतिसाद दिला नाही.

म्हणून मुकेश हे नाते तो जतन करू शकला नाही आणि या कारणावरून तो नै’रा’श्यात गेला. आणि नंतर या नै’रा’श्यामुळे त्याने आ’त्मह’त्या केली. लग्नाच्या 7 महिन्यांनंतर पतीच्या निधनानंतरही रेखा तिच्या भांगात सिंदूर भरत राहिली आणि आजही ती तिच्या भांगात सिंदूर भरताना दिसत आहे. रेखाच्या चाहत्यांसाठी आजही ते एक रहस्य आहे की रेखा नेमके कुणाचे नावाचे कुंकू कपाळी लावत आहे.

पहिल्या भेटीतच मुकेशचे रेखवर जडले होते प्रेम :
रेखा आणि मुकेश यांची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती. मुकेशला रेखा तिच्या पहिल्या भेटीपासूनच आवडण्यास सुरुवात झाली होती. आणि त्याने अखेर रेखासोबत लग्न करायचे ठरवले. यानंतर मुकेशने रेखासमोर लग्नाचा प्रस्ताव टाकला. त्यानंतर लग्नाच्या वेळी रेखा 35 वर्षांची होती आणि मुकेश अवघ्या 37 वर्षांचा होता.

लग्नानंतर मुकेशने रेखाला फिल्म स्टार्सना तिच्या लग्नाबद्दल सांगायला सांगितले, जे रेखाने मान्य केले नाही. त्यावेळी रेखाला फक्त 3 जणांना भेटायचे होते, ज्यात अकबर खान, संजय खान आणि हेमा मालिनी यांचा समावेश होता, त्यानंतर दोघेही हेमा आणि धर्मेंद्रच्या घरी पोहोचले. त्यावेळी अभिनेत्री हेमा मुकेशला पाहताच म्हणाली, ‘आता असे म्हणू नकोस की तू या माणसाशी लग्न केले आहे’. रेखा म्हणाली, ‘हो, आम्ही विवाहित आहोत’. यानंतर हेमाचा प्रश्न होता- ‘तो खूप श्रीमंत आहे’? पण रेखाने याला उत्तर दिले नाही.

मुलाखतीत राज उघडले :-
एका मुलाखती दरम्यान रेखाने खुलासा केला की ती अमिताभ बच्चनची पहिल्याच नजरेत दिवानी झाली होती. पहिल्या भेटीत तिने अमिताभ यांना स्वतःचे मन अर्पण करून बसली. त्यांनी ‘सिलसिला’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मुक्कदार का सिकंदर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसह अमिताभ यांच्यासह सुमारे १० सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

‘सिलसिला’ हा चित्रपट या दोन जीवनावर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये त्यांचे वास्तविक जीवन दर्शविले गेले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता, चित्रपटाचे “रंग बरसे” हे गाणेही हिट होते, जे आजही गाजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12