रांचीमध्ये तरुण मुलांसोबत ‘IPL’ची तयारी करतोय MS धोनी, पहा जबरदस्त बॅटिंगचे फोटो…

रांचीमध्ये तरुण मुलांसोबत ‘IPL’ची तयारी करतोय MS धोनी, पहा जबरदस्त बॅटिंगचे फोटो…

2020 मध्ये एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. अनेक क्रिकेटप्रेमींसाठी तो सर्वात खराब क्षण होता. धोनीने प्रत्यक्षात येऊन खेळणे महत्वाचे नव्हते. केवळ तो आहे, याच एका विश्वासावर भारतीय क्रिकेट संघाने आजवर अनेक गेम्स जिंकले आहेत. क्रिकेटप्रेमी आज देखील धोनीला खेळताना बघण्यासाठी आतुर असतात.

आयपीएल च्या माध्यमातून क्रिकेटप्रेमी सध्या धोनीचा खेळ बघू शकत आहेत. मात्र, यंदाचा आयपीएल त्याचा अखेरचा हंगाम असेल, असं बोललं जात आहे. आपल्या देशामध्ये कोणताही खेळाडू 7 क्रमांकाच्या जर्सीमध्ये क्रिकेट खेळताना दिसला कि तो जणू धोनीचं आहे असंच भासत.

त्यामुळेच तर जणू 7 क्रमांकाची जर्सी घालण्याचा अधिकार कोणत्याही खेळाडूला असेल तर तोकेवळ धोनीचं आहे, असं म्हणलं जात. धोनीने टीम इंडियाला T20 विश्वचषक 2007, ODI विश्वचषक 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. त्याचबरोबर या खेळाडूने आपल्या कर्णधारपदाने आणि अप्रतिम यष्टिरक्षणाने भारतीय संघाला अशा दिग्गज टप्प्यावर नेले, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

धोनीसारखा कर्णधार भारताला पुढील कित्येक वर्षांपर्यंत मिळणार नाही. केवळ कर्णधारच नाही तर त्याच्यासारखा विकेट कीपर देखील भारताला अनेक वर्ष मिळणार नाही. धोनी हा असा खेळाडू आहे जो विकेटच्या मागून खेळ बदलतो. या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

एमएस धोनी आता आयपीएल 2023 च्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. आता आपल्या आयपीएलच्या सामन्यांसाठी त्याने नेटमध्ये घाम गाळण्यास सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या घरच्या मैदानावर आयपीएल 2023 ची तयारी करत आहे.

क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या खेळाडूला मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना पाहायचे आहे. त्यामुळेच माहीने आयपीएल 2023 ची तयारी सुरू केली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रांचीच्या युवा खेळाडूंसोबत सराव करताना दिसत आहे.

तरुण खेळाडूंच्या चेंडूवर त्याने षटकार खेचले. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, एमएस धोनीने आयपीएल 2022 दरम्यान चेन्नईचे कर्णधारपद सोडले होते. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते. तथापि, 8 सामन्यांनंतर, जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाने खराब कामगिरी केली आणि त्यानंतर धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार झाला. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्ये धोनीची धुव्वादार बॅटींग पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12