‘रणविर’ सिंह ची ‘आज्जी’ देखील करायची चित्रपटात काम, या दिगग्ज अभिनेत्याने दिला होता ‘ब्रे’क’…

सध्या बॉलिवुडमध्ये काही अंशी असे अभिनेते आहेत की, ज्यांच्या विना बॉलिवूडची चर्चा ही अधुरी राहते. यामध्ये नवोदित कलाकारांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांचा जमाना आता काही प्रमाणात कमी झाला आहे. तरी या तुलनेत आमिर खान आणि सलमान खान हे चांगले चित्रपट देऊन नाव गाज वत असतात.
मात्र, त्या तुलनेत शाहरुख खानला आता सुरुवाती सारखे चित्रपट मिळत नाहीत.मात्र, सलमान खान यांची चलती आजही तेवढ्याच प्रमाणात आहे. सलमान खान आता पन्नाशी पार गेला असला तरी त्याचा राधे हा चित्रपट आता इद च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
अपेक्षेप्रमाणे हा चित्रपटदेखील शं’भर को’टी’चा ग’ल्ला जमा होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही. नव्या पिढीमध्ये रणबीर कपूर, रणवीर सिंग हे आता चांगलेच नाव कमावत आहेत. रणवीर सिंह याने अनेक चित्रपटातून भूमिका केल्या असल्या तरी त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती बाजीराव मस्तानी या चित्रपटातून.
या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते संजय लीला भन्साळी यांनी. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण ही दिसली होती तसेच प्रियंका चोपडा देखील दिसली होती दीपिका पादुकोण हिने मस्तानीची भूमिका साकारली होती. तर प्रियांका चोप्रा हिने काशीबाई ची भूमिका साकारली होती. दीपिका आणि प्रियंका या दोघींनीही चांगल्या भूमिका केल्या.
मात्र, सर्वाधिक भाव खाऊन गेला होता तो रणवीर सिंह. त्याने गली बॉय सारखा चित्रपट देखील केला. हा चित्रपट चांगला गाजला. या चित्रपटानंतर त्याने दीपिका पदुकोणसोबत लग्न केले. रणवीर सिंह बद्दल सांगायचे कारण म्हणजे रणविर सिंह यांच्या घराण्याला देखील चित्रपटाचा मोठा इतिहास आहे.
मात्र, हे अनेक जणांना माहीत नसेल. रणवीर सिंह याची आजी देखील चित्रपटात एकेकाळी काम करायची. ही बाब अनेकांना माहीत नव्हती. त्यामुळे आम्ही आपल्याला या लेखांमध्ये याबाबत माहिती सांगणार आहोत.रणवीर सिंह यांच्या आजीचे नाव चांद बर्क असे आहे. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते.
पन्नास ते साठ दशकांमध्ये तिने अनेक चित्रपटात काम केले. सुरुवातीला तिने दिग्दर्शक निरंजन यांच्यासोबत पहिला विवाह केला होता. मात्र, काही काळातच हा विवाह संपुष्टात आला. त्यानंतर त्यांनी उद्योगपती सुंदर सिंह यांच्यासोबत दुसरा विवाह केला होता. सुंदर सिंह म्हणजेच रणविर सिंह यांचे आजोबा आहेत.
चाँद बर्क यांना 1954 मध्ये बूटपॉलिश या चित्रपटामध्ये अनेकांनी पाहिले असेल.या चित्रपटात त्यांना दिग्गज अभिनेते व शोमन राजकपूर यांनी संधी दिली होती. त्यानंतर हाच वारसा रणवीर सिंह पुढे चालवत आहे. तो त्याच्या आजी सारखा असल्याचे सांगण्यात येते.