येणार गदरचा सिक्वेल ! गदरच्या डायरेक्टने दिले संकेत, म्हणाला; यावेळी ‘हा’ अभिनेता असणार लीड रोल मध्ये…

2001 हे साल अतिशय गाजले होते, ते लगान आणि गदर या चित्रपटाने. या सालातील हे दोन चित्रपट अतिशय लक्षणीय असे ठरले होते. सुरुवातीला असे सांगण्यात येत होते की, आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट बाजी मारेल. मात्र, गदर या चित्रपटाने देखील तेवढीच कमाई केली होती. 15 जून 2001 रोजी हे दोन्ही चित्रपट भारतात प्रदर्शित झाले होते.
या चित्रपटाने त्यावेळी बॉक्सऑफिसवर खूप कमाई केली. लगान या चित्रपटाची निर्मिती आमिर खान व इतरांनी केली होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. या चित्रपटाला ऑस्कर साठी देखील पाठविण्यात आले होते. तर या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते.
हा चित्रपट त्यावेळी प्रचंड चालला होता. सनी देओलची संवादफेक आणि डायलॉग चित्रपटांमधील प्रबळ स्थान होते. त्यामुळे या चित्रपटाने लगानला देखील टक्कर दिली होती. गदर चित्रपटांमध्ये संगीत देखील अतिशय गाजले. या चित्रपटातील गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठावर रेंगाळतात. या चित्रपटामध्ये सनी देओल याने तारासिंह ची भूमिका साकारली होती.
तारासिंह हे पात्र त्यांनी अतिशय व्यवस्थित रित्या साकारले होते. तर या चित्रपटात अमिषा पटेल हिने सकीना हिची भूमिका साकारली होती. भारत आणि पा’किस्ता’न यांच्यातील फा’ळ’णी दरम्यानचा हा चित्रपट होता. सनी देओल हा ट्रक ड्रायव्हर असतो आणि तो सामान पोहोचवण्याचे काम करत असतो. ज्या महाविद्यालयात तो जातो साकिना असते आणि त्यानंतर या दोघांची प्रेम कहाणी सुरू होते.
मात्र, भारताची फाळणी होते आणि सकिना ही पा’किस्ता’नात जाते. त्यानंतर तिच्या शोधामध्ये तारा सिन्हा पा’किस्ता’नात जातो. तिथे मारधाड करतो, हे चित्रपटात पाहण्यासारखे आहे. सनी हा रागाच्या भारामध्ये हापसा उपसून काढतो. त्यावेळेस हा सीन प्रचंड गाजला होता. त्यानंतर हिं’दुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा, हा डायलॉग देखील त्याचा खुप गाजला होता.
या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले होते. विशेष म्हणजे सनी आणि अमिषा पटेल यांचा चित्रपटात जो मुलगा असतो तो देखील आता मोठा झाला आहे त्याने गदर चित्रपटात जीतची भूमिका साकारली होती. हा अभिनेता म्हणजे उत्कर्ष शर्मा होय. आता तो खूप मोठा झाला आहे. उत्कर्ष शर्मा हा या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा होता.
आता सहाजिकच तो मोठा झाल्याने या चित्रपटा च्या सिक्वेल ची चर्चा रंगली आहे. याबाबत अनिल शर्मा म्हणाले की, आता उत्कर्ष मोठा झाला आहे. त्यामुळे सिक्वेल करण्याचा आम्ही विचार करत आहोत. अमिषा आणि सनी ची प्रेम कहाणी पुढे उत्कर्ष पुढे नेईल, असा आमचा विचार सुरू आहे. चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. लवकरच याबाबत आम्ही घोषणा करू, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या चित्रपटाचा सिक्वेल कधी येतो याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.