‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी केलंय भारतीय मुलींबरोबर लग्न, ५ नंबरची आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा फोटो..

भारत आणि पा’किस्तान दोन्ही पण देश एकमेकांचे क’ट्टर विरोधक आहेत त्याचबरोबर या देशाशी संबंध जास्त चांगले नाहीत हे प्रत्येकाला माहीत आहे. याचे पडसाद क्रिकेट मैदानावरही दिसून येतो.
पण जरी दोन्ही देशातील संबंध चांगले नसतील, तरी अनेक क्रिकेटपटूंनी विशेषत: पाकिस्ता’नी क्रिकेटपटूंनी अनेक भारतीय मुळ असणाऱ्या मुलींची मने जिंकली आहेत. एवढेच नाही तर, तर त्यांच्यासोबत लग्न करून ते सुखाचा संसार करत आहेत. तर जाणून घेऊया, त्या पाच निराळ्या जोडींविषयी.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा :पा’किस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्याशी २०१०मध्ये लग्न केले. त्यांना आता एक मुलगादेखील आहे. त्याचे नाव इजान मिर्झा मलिक आहे. सानिया लग्नानंतरही भारतात राहिली होती.
पा’किस्तानला ती कधी-कधी तर जाते. शोएबचे दुबईत घर आहे जिथे ते दोघे मिळून राहतात. शोएबने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३५ सामने खेळत १८९८ धावा केल्या आहेत. तर, वनडे कारकिर्दीत २८७ सामन्यात ७५३४ धावा आणि टी२० कारकिर्दीत ११३ सामन्यात २३२१ धावा केल्या आहेत.
हसन अली आणि शामिया आरजू :पा’किस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने २०१९ला भारतीय मुळ असणाऱ्या शामिया आरजू हिच्याशी दुबई येथे लग्न केले. शामिया ही दुबई येथे फ्लाइट इंडिनिअर म्हणून काम करते. तसे पाहिले तर, शामिया ही भारतातील हरियाणामधील नूह जिल्ह्यातील चंदेनी गावातील आहे. हसनने आतापर्यंत कसोटीत ९ सामने खेळत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तर, वनडेत ५३ सामन्यात ८२ आणि टी२०त ३० सामन्यात ३५ विकेट्स घेतल्या आहेत.
जहीर अब्बास आणि रीता लूथरा :पा’किस्तानचे माजी क्रिकेटपटू जहीर अब्बास यांनी १९८८मध्ये रीता लूथरा यांच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर लूथरा यांनी त्यांचे नाव बदलून समीना अब्बास ठेवले. त्या इंग्लंडमध्ये इंटिरिअर डिसायनिंगचा कोर्स करत होत्या. तर, अब्बास त्यावेळी इ्गंलडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती.
अब्बास यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ७८ कसोटी सामन्यात ५०६२ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या १२ शतकांचा समावेश होता. तर, वनडेत ६२ सामने खेळत २५७२ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ७ शतकांचा समावेश होता.
मोहसिन खान आणि रीना रॉय :बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय यांनी पा’किस्ता’नचे उजव्या हाताचे माजी फलंदाज मोहसिन खान यांच्याशी लग्न केले. त्यांच लग्न १९८३ मध्ये झाले होते. पण, त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि १९९०ला त्यांचा घ’टस्फो’ट झाला. त्यांना तेव्हापर्यंत जन्नत नावाची मुलगीदेखील झाली होती.
रीना यांनी आशा, नागिन आणि अपनापन अशा प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे. त्या १९८० च्या दशकातील शानदार आणि सर्वात महागडी अभिनेत्री होत्या. मोहसिन यांनी पाकिस्तानकडून ४८ कसोटी सामन्यात २७०९ धावा केल्या होत्या. तर वनडेत ७५ सामने खेळत १८७७ धावा केल्या होत्या.