‘या’ १० अभिनेत्रींचे होते क्रिकेटपटूंसोबत प्रेम सबंध, पहा ६ नंबरच्या अभिनेत्रीचा ‘या’ खेळाडूसोबत साखरपुडा होऊनही झाले नाही लग्न..

आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवुड यांचे खूप जुने नाते आहे. हँडसम क्रिकेटर सुंदर अशा बॉलीवूड अभिनेत्रींना स्वतःकडे आकर्षित करत राहतात. अनेक अभिनेत्रींना क्रिकेटर मध्ये आपले खरे प्रेम मिळाले आणि त्यांनी त्यांच्या सोबत विवाहदेखील केला.

शर्मिला टागोर आणि नवाब पतौडी यांनी सुरू केलेली ही परंपरा विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र अशा अनेक प्रेम कथा आहेत ज्या सुरु तर झाल्या, मात्र विवाह पर्यंत पोहोचल्या नाहीत. अनेक क्रिकेटर अभिनेत्रींच्या प्रेमात पडले मात्र त्यांच्या सोबत लग्न करू शकले नाही.

१. विराट कोहली आणि इसाबेल लीटे:- 2012 मध्ये विराट कोहली क्रिकेट क्षेत्रांमध्ये आपला आपला जम बसवत होता. त्याच काळात त्याला ब्राझिलियन ब्युटी इजाली इजाबेल लिटे सोबत प्रेम झाले. आमिर खानच्या ‘तलाश’ या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये डब्ल्यू केला होता. 2012 पासून 2014 पर्यंत या दोघांचे अफेअर होते. अनेक वेळा परदेशात देखील त्या दोघांना सोबत शॉपिंग करताना, कॉफी पिताना पाहिले गेले होते. मात्र त्यानंतर हे नाते तुटले, त्यानंतर विराटच्या आयुष्यामध्ये अनुष्का आली.

२. कपिल देव आणि सारिका:- सुंदर भुरे डोळे आणि तेवढाच आकर्षक असा चेहरा असणाऱ्या सारिकाचे सौंदर्य आजही तेवढेच ताजे आहे. सारिका आणि कमल हसन या दोघांच्या प्रेम कथेबद्दल अनेकांना माहित आहे. मात्र त्याआधी सारिकाच्या आयुष्यामध्ये एक खेळाडू आला होता. देशातील पहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारे कपिल देव आणि सारिका यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

असं सांगितलं जातं की, कपिल देव यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत भेट घालवून देण्यासाठी सारिकाला आपल्या पंजाबच्या घरी नेले होते. मात्र काहीच दिवसात कपिलदेव यांची पहिली गर्लफ्रेंड रोमी भाटिया परत त्यांच्या आयुष्यात अली. आणि रोमी वरच आपले खरे प्रेम आहे हे जाणून कपिल देव आणि सारिका यांचे ब्रेकअप झाले.

३. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित:- संजय दत्त आणि माधुरी दीक्षित त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मात्र ते कधीच लग्न करू शकले नाही, माधुरी दीक्षितच्या आईचा त्या दोघांच्या विवाहासाठी पुरजोर विरोध होता. त्यामुळे ते दोघे वेगळे झाले मात्र संजय दत्तच नाही तर, अजून एका व्यक्तीसोबत बॉलीवूडच्या धक-धक गर्लच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

माधुरी दीक्षितचे प्रेम क्रिकेटर अजय जडेजावर जडले होते. माधुरी व अजय या दोघांच्या प्रेम कथेबद्दल त्यावेळी चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अजय जडेजा आणि माधुरी एका मॅगझीनच्या कव्हर पेज शूटिंगच्या दरम्यान भेटले होते. मॅच फिक्सिंगमध्ये अजयचे नाव आले आणि माधुरी व त्यांचे ब्रेकअप झाले.

४. सचिन तेंडूलकर आणि शिल्पा शिरोडकर:- आपल्या तुफान बॅटिंगने जगभरात किर्ती मिळवलेल्या सचिन तेंडुलकरचे मन बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शिरोडकर वर आले होते. त्यावेळी सचिनचे लग्न झालेले नव्हते. दोघेही महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्या दोघांच्या अफेअरची चर्चा जरा जास्तच रंगली होती. बऱ्याच वेळा त्या दोघांना डिनर साठी भेटता न पाहिले गेले होते. मात्र सचिनने आमच्या दोघात असे काहीही नसल्याचा खुलासा केला होता.

५. सौरव गांगुली आणि नगमा:- बॉलिवुड आणि क्रिकेट मधली सगळ्यात वादग्रस्त प्रेम कथा म्हणून सौरव गांगुली आणि नगमा यांची जोडी प्रसिद्ध आहे. याचे कारण असे, सौरव गांगुली नगमाच्या प्रेमात पडला तेव्हा तो विवाहित होता. १९९९ च्या क्रिकेट वर्ल्ड कप च्या वेळी सौरभ आणि नगमा या दोघांची भेट झाली.

असं सांगितलं जातं की, सौरव सुरुवातीपासूनच नगमाकडे आकर्षित होता. मात्र तिला समोर बघून परत पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यांच्या अफेअरमुळे सहाजिकच सौरभ गांगुली आणि त्याच्या पत्नी मध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळे सौरभने आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत नगमासोबत ब्रेक अप केले.

६. रवी शास्त्री आणि अमृता सिंह:- सनी देओल सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृता सिंहच्या आयुष्यात रवी शास्त्री आला. रवी शास्त्री आणि अमृता सिंह या दोघांचे किस्से आजही अनेक क्रिकेटर रंगवून सांगतात. असे म्हणतात की, या दोघांनी गुपचूप साखरपुडा देखील केला होता. मात्र अमृताला आपल्या करिअरवर फोकस करायचा होता, त्यामुळे हा साखरपुडा तुटला आणि ते विभक्त झाले. अलीकडच्या काळात अभिनेत्री निम्रत कौर आणि रवी शास्त्रीच्या अफेरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

७. सुरेश रैना आणि श्रुती हसन:- आपली आई सारिका प्रमाणेच, श्रुती हसन देखील एका क्रिकेटर च्या प्रेमात पडली. सुरेश रैना आणि श्रुती हसन या दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. श्रुती हसन चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचच्या वेळी, अनेक वेळा सपोर्ट करण्यासाठी येत होती. त्याच वेळी त्या दोघांमध्ये ओळख निर्माण झाली, त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले असे काहीजण सांगतात. परंतु सुरेश रैनाने स्वतः ट्विट करून आमच्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीच नाही असे सांगितले होते.

८. किम शर्मा आणि युवराज सिंग:- किम शर्मा आणि युवराज सिंग या दोघांमध्ये देखील अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. त्याबद्दलचा खुलासा स्वतः किम शर्माने देखील केला होता. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये दोघांनी ब्रेकअप केले. युवराजसिंगच्या आईला किम कधीच आवडली नव्हती त्यामुळे ते दोघे वेगळे झाले, असं म्हणलं जात.

९. युवराज सिंग आणि दीपिका:- युवराज सिंग चे नाव बॉलीवुड मधल्या वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले त्यापैकी एक दीपिका पादुकोण देखील आहे. त्या दोघांना बऱ्याच वेळा शॉपिंग करताना आणि कॉफी पिताना पाहिला गेले होते. त्याच वेळी दीपिका पादुकोणचा पहिला चित्रपट ओम शांती ओम प्रदर्शित होणार होता. त्यामुळे अनेकांना हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता असं वाटतं. अचानक सुरू झालेल्या त्यांच्या अफेअरच्या चर्चा मध्येच कुठेतरी गायब झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12