या व्यक्तीशीवाय ‘मलायका’ अरोराचे जगणं झालय मुश्किल, ही सर्वात ‘प्रिय व्यक्ती’ दूर गेल्याने मलायका झाली भावुक…

अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खानची पूर्व पत्नी मलायका अरोरा यांनी त्यांचा मुलगा अरहान खानसोबत रविवारी एकत्र येऊन दुपारचं जेवण एकत्र केलं. यावेळी अरोरा कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्यासोबत होते. पापाराझीने मुंबईतील लोकप्रिय रेस्तराँमध्ये फॅमिली गेट-टुगेदर केलं. यावेळी त्यांच्या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फॅमिली गेट-टुगेदरमध्ये मलायकाचे आई- वडील, बहीण अमृता अरोरा आणि तिचा मुलगा रियानही लंचला उपस्थित होते. अनेक महिन्यांनी संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याने प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक समाधान आणि आनंद दिसत होता. या दरम्यान मलायका अरोराची आई अरबाज खानचं प्रेमाने चुंबन घेताना दिसली. पापाराझींनी हा सुंदर क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला.
अरबाज खान आणि मलायका अरोराचं संपूर्ण कुटुंब रविवारी एकत्र होते. सगळ्यांनी दुपारचं जेवण एकत्रच केले. यानंतर प्रत्येकाने शांतपणे छायाचित्रकारांना फोटोही दिले. यावेळी मलायकाने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलं होतं. यावर तिने लाल रंगाचे बूट घातले होते. तर अरबाज खानने टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घातली होती.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. दोघांचे लग्न जवळपास १९ वर्ष टिकले. या जोडप्याला अरहान खान हा १८ वर्षांचा मुलगा आहे. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे आणि अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे.
अभिनेत्री मलायका अरोराने तिचा मुलगा अरहान याच्यासाठी एक अतिशय भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मलायकाने या पोस्टमध्ये आपल्या लेकाच्या नवीन प्रवासाबद्दलची माहितीही दिली. तसेच त्याच्याबद्दल काळजी, प्रेम अशा संमिश्र भावना तिने या पोस्टमधून मांडल्या आहेत. या पोस्टबरोबर तिने अरहानसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
मलायका आणि अरहान खिडकीतून बाहेर पाहताना दिसत आहे. अरहान काचेच्या खिडकीला हात लावून उभा राहिलेला दिसत आहे. तर गाऊन घातलेली मलायका आपल्या लेकाच्या बाजूला उभी दिसत आहे. या फोटोसोबत मलायकाने एक अतिशय भावुक पोस्ट लिहिली आहे.
मलायकाने या पोस्टमधून तिच्या लेकाला अरहानच्या नवीन प्रवासाबद्दल लिहिले की, ‘आता आपल्या दोघांचा एक नवीन आणि अनोळखी प्रवास सुरू होत आहे. या प्रवासाची उत्सुकता आहे त्याचप्रमाणे एक भीतीदेखील आहे. पण नवीन अनुभवदेखील मिळणार आहे. मला फक्त इतकेच माहिती आहे की अरहान मला तुझा अभिमान आहे.
आता स्वबळावर उडण्याची वेळ आली आहे. उंच भरारी घे आणि आपली स्वप्ने पूर्ण कर. मला तुझी खूप आठवण येईल.’ मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहान पुढील शिक्षणासाठी परदेशी जात आहे. अरहानने त्याच्या शिक्षणात काही काळासाठी ब्रेक घेतला होता. मलायकाने विमानतळावरील अरहानचा एक फोटो शेअर केला आहे.
त्यात अरहान त्यांचा कॅस्पर या पाळीव श्वानाला जवळ घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले, ‘तुला गुडबाय करणे देखील माझ्यासाठी खूप कठीण आहे.’ दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अरहान सातत्याने एकत्र दिसत होते. रविवारी मलायकाने एक फॅमिली गेट टू गेदर ठेवले होते. तेव्हा अरबाज खान ही उपस्थित होता.
या गेट टू गेदरला मलायकाचे आई-वडील, बहिण अमृता अरोरा, अरबाज खान आणि अरहान सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी देखील मलायका आणि अरहान मॉर्निंग वॉकला एकत्र दिसले होते. त्यावेळी मलायकाचा चेहरा खूपच उदास दिसत होता. अर्थात त्यावेळी अरहान परदेशी जाणार आहे, हे समजले नव्हते.