‘या’ फॉर्मेटमधून निवृत्ती घेणार रोहित शर्मा…? भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी अपडेट आली समोर…

‘या’ फॉर्मेटमधून निवृत्ती घेणार रोहित शर्मा…? भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी अपडेट आली समोर…

या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. भारताने शेवटचा विश्वचषक २०११ मध्ये मायदेशात जिंकला होता. तेव्हापासून टीम इंडियाची बॅग रिकामी आहे. यावेळी तो दुष्काळ घरबसल्या संपवण्याची संधी आहे. कर्णधार रोहित शर्माला हे चांगलेच माहीत आहे.

आता वनडे सामन्यात रोहितची सुरुवात पूर्वीसारखी सहजतेने होत नाही. तो येताच गोलंदाजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. डावाची सुरुवात करताना जो शॉट तो पूर्वी कधीच खेळला नाही, तो आता नेमका तोच वापरत आहे. सध्या टीम इंडिया न्यूझीलंड सोबत वन डे सामने खेळत आहे.

हे सामने झाल्यानंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या संघामध्ये टी-२० चे सामने खेळले जाणार आहेत. मात्र हे सामने खेळण्यासाठी संघामध्ये टीम इंडियाच्या खास दोन खेळाडूंचे नाव वगळण्यात आले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टीम इंडियामध्ये नाहीयेत. हा निर्णय समोर येताच पुन्हा एकदा या खेळाडूंच्या निवृत्तीबद्दलच्या बातम्याना उधाण आलं आहे.

रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. मात्र, लवकरच रोहित शर्मा एखाद्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या सगळ्या दरम्यान रोहित शर्माच्या भविष्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या वर्षी तो एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. टी-20 विश्वचषक 2022 पासून त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर एक किंवा दोन फॉरमॅटमधून निवृत्त होऊ शकतो.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ‘भावी कर्णधारपदाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. रोहित आमचा कर्णधार आहे आणि त्यानंतरच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वचषकानंतर चर्चा होईल. रोहित विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकतो. हार्दिकला एकदिवसीय उपकर्णधारपद सोपवण्यात आले असून, तो भविष्यातही उपकर्णधारपद स्वीकारू शकतो.

३६ वर्षीय रोहित शर्मानंतर केएल राहुल कसोटी फॉरमॅटमध्ये संघाची सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. त्याचवेळी, हार्दिक पांड्या टी-20 आणि वनडेमध्ये संघाचा कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ‘केएल राहुल कसोटीत उपकर्णधार आहे यावरून तुम्हाला योग्य ते संकेत मिळालेच आहेत.

उपकर्णधारपदात पर्यायांची कमतरता नाही.’ तो पुढे म्हणाला, ‘हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. तो तरुण आहे आणि त्याच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. सध्या तरी रोहितनंतर त्याच्यापेक्षा चांगला पर्याय नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12