‘या’ ४ प्रसिद्ध अभिनेत्रींनी सनी देओलसोबत काम करण्यास दिला होता नकार, पैकी एक म्हणाली होती की सनी देओल फक्त…

सनी देओल म्हटले की, आपल्यासमोर एक डायलॉग आवर्जून समोर येत असतो. ‘ये ढाई किलो का हात जब उठता है, तो आदमी जिंदगी से उठ जाता है’, या डायलॉगने सनी देओल याला रातोरात स्टार बनवले होते. घायल या चित्रपटामध्ये सनी देओल यांनी अतिशय आक्रमक भूमिका केली होती. हा चित्रपट त्याचा त्यावेळी प्रचंड चालला.
या चित्रपटामध्ये राज बब्बर यांची भूमिका देखील होती. त्यानंतर सनी यांची दामिनी चित्रपटातील भूमिका देखील खुप गाजली. दामिनी या चित्रपटात त्यांच्यासोबत मीनाक्षी शेषाद्री दिसली होती. मीनाक्षी शेषाद्री ही ऋषी कपूर सोबत लग्न करून जाते आणि त्यानंतर ऋषी कपूर यांचा भाऊ हा मोलकरणीवर अ’त्याचा’र करतो आणि ते दृश्य मीनाक्षी शेषाद्री पाहते.
त्यानंतर मीनाक्षी शेषाद्री को’र्टात जाऊन साक्ष देतात आणि नंतर सनी त्यांचे हे प्रक’रण लढतो. अशी या चित्रपटाची कथा होती. हा चित्रपट त्या वेळी प्रचंड गाजला होता. यामध्ये अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यातील जुगलबंदी ही खूप गाजली होती. त्यानंतर सनी देओल यांनी अनेक चित्रपटात काम केलेले आहे.
सनी यांचा गदर एक प्रेम कथा या चित्रपटाला नुकतेच वीस वर्ष पूर्ण झाले आहेत. 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासमोर त्यावेळेस लगान चित्रपटाचे आव्हान होते. मात्र, असे असतानाही सनी यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते.
आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही सनी यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी त्यावेळेस काम करण्यास नकार दिला होता. यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींचा समावेश होता.
1) काजोल- 2001 मध्ये आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी अनिल शर्मा यांनी काजोल हिलादेखील विचारणा केली होती. मात्र, तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. तिला असे वाटत होते की, आपण सनीपेक्षा फारच लहान आहोत. त्यामुळे हा चित्रपट चालेल की नाही, अशी तिच्या मनात शंका होती. मात्र, कालांतराने ही भूमिका अमिषा पटेल हिला भेटली आणि तिने ही भूमिका अजरामर केली.
2) श्रीदेवी- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिने सनी देओल यांच्यासोबत चालबाज, निगाहे या चित्रपटामध्ये काम केलेले आहे. मात्र, असे असतानाही तिने पुढील काही चित्रपटांमध्ये सनी देओल सोबत काम करण्यास नकार दिला होता. याचे कारण मात्र काही कळू शकले नाही.
3) ऐश्वर्या राय बच्चन- ऐश्वर्या राय बच्चन हिनेदेखील सनी देओल सोबत काम करण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर तिने सनी सोबत शहीद या चित्रपटात काम केले आहे. सनी देओल सोबत काम करण्यास आपल्याला अडचण नाही. मात्र, त्यांचे वय खूप अधिक असल्याने मी काही चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे ऐश्वर्याने सांगितले आहे.
4) माधुरी दीक्षित नेने- माधुरी दीक्षित हिने देखील सनी देओल सोबत त्रिदेव या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट चालला होता. मात्र, त्यानंतर माधुरी दीक्षित-नेने हिने सनी देओल सोबत एकही चित्रपटात काम केले नाही. याबाबत माधुरी दीक्षित म्हणते की, त्यानंतर मला सनी सोबत काम करण्यासाठी भूमिका मिळाली नाही.