‘या’ तरुणीच्या बॉडीपुढे सलमान, हृतिक आहेत फेल! पहा 22 इंचाचे बायसेप्स, 75 इंचाची छाती आणि….

आपल्या बॉलीवूडमध्ये बॉडी बनवण्याचे क्रेज सलमान खानमुळे सुरु झाले. त्याचेच अनुकरण करत अभिनेता हृतिक रोशनने देखील बॉडी बनवण्यासाठी अनेकांना प्रवृत्त केले. त्यानंतर आता केवळ बॉलीवूड किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण देशात अनेकजण या अभिनेत्यांकडून प्रेरणा घेत बॉडी बनवत असल्याचं आपण पाहिलं आहे.
अगदी सर्वसाधारण मुलं सुद्धा जिममध्ये जाऊन उत्तम आणि आकर्षक अशी बॉडी बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अगदी काटेकोरपणे सर्वच गोष्टीचे पालन करावे लागते. त्यानंतर मसल्स बनतात, आणि मग सिक्स पॅक वाल आकर्षक अशी बॉडी बनते. मात्र मुलीच्या बाबतीत जिम आणि फिटनेसची परिभाषा वेगळी आहे.
सुंदर आणि कमनीय असा बांधा, म्हणजेच सुंदर आणि फिट मुलगी आहे असं समजलं जात. मुख्य म्हणजे मुलांप्रमाणे मसल्स बनवणे मुलींसाठी अशक्य असते असं बोललं जात. मात्र हा समज एका खूपच सुंदर मुलीने मोडीत काढला आहे. तस बघता एकूणच आता बॉडी बिल्डिंगमध्ये रस दाखवणाऱ्या महिला देखील बघितल्या जात आहेत.
मात्र यामध्ये देखील एक अशी मुलगी आहे, जिला बघून भल्याभल्याना घाम फुटतो. रशियातील या मुलीला कुस्तीची प्रचंड आवड आहे. यामुळे ती आता इतकी ताकदवान झाली आहे की ती कोणालाही उचलून फेकू शकते. तिचे नाव नतालिया कुझेन्सोवा आहे. 14 वर्षांची असताना तिने बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली.
सुरुवातीला ती खूप लुकडी-सुकडी होती आणि तिने वजन वाढवण्यासाठी वेटलिफ्टिंग सुरू केली. मग काय होतं, हळूहळू वजन आणि मसल पॉवर वाढत गेली आणि आज ती एखाद्या पैलवानसारखी दिसतेय. तिच्या अशा मसल्स बॉडीमुळे लोक तिला लेडी हल्क म्हणून संबोधतात.
नतालियाने आत्तापर्यंत अनेक इव्हेंटमध्ये भाग घेतला असून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. नतालियाने यापूर्वी निवृत्ती घेतली होती, पण पुन्हा एकदा पुनरागमन करत तिने कसरत सुरू केली आहे.
सध्या ३१ वर्षीय नतालियाने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तिच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत ज्यात डेडलिफ्ट, बेंचप्रेस आणि आर्मलिफ्टिंगचे जागतिक विक्रम आहेत. वयाच्या 14 व्या वर्षी जिम जॉईन केलेली नतालिया 9 वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या 23 व्या वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट मांसल शरीर असलेल्या महिलांपैकी एक बनली.
नतालियाचे शरीर इतके प्रभावी आणि शक्तिशाली आहे की तिला पाहून पुरुषांनाही लाज वाटू लागते आणि त्यांना देखील हेवा वाटतो. बॉलीवूड अभिनेत्यांना देखील तिने आपल्या फिटनेसने माघे टाकले आहे. माहितीनुसार, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बायसेप्स 17 इंच आहेत, त्याचं वजन 75 किलोग्रॅम आहे.
तर आकर्षक बॉडीसाठी जागतिक स्तरावर फेमस असलेला अभिनेता ऋतिक रोशनचे बाइसेप्स 17.5 इंचाचे आणि वजन 80 किलोग्रॅम आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरूखचे बायसेप्स 14 इंच आहेत. तर फिटनेस साठी ओळखल्या जाणाऱ्या जॉनचे बायसेप्स 18 इंचाचे आहेत. मात्र या सर्वाना नतालियाने माघे टाकले आहे.
5 फूट 5 इंच उंचीच्या नतालियाचं वजन आता 100 किलोग्रॅमपेक्षाही जास्त आहे. तिचे बायसेप्स 22.5 इंचाचे आहेत. 140 किलोपेक्षा जास्त वजन असलेली नतालिया 240 किलोग्राम का वजन उभ्या उभ्या उचलते.