‘या’ चित्रपटामुळे रोडवर आला होता जॉकी श्रॉफ, विकावे लागले होते घरातील फर्निचर तर बायकोला करावे लागले होते ‘हे’ काम…

बॉलीवूड मध्ये अनेक कलाकारांनी स्वतःच्या बळावरती आपली खास ओळख निर्माण केली आहे. अशा काही मोजक्या कलाकारांपैकी एक अभिनेता जॅकी श्रॉफ देखील आहेत. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफला पाहिले आणि ‘हिरो’ या चित्रपटातून त्यांना काम करण्याची संधी दिली.

या चित्रपटांमध्ये जॅकी श्रॉफ यांचा अभिनय सर्वांच्याच पसंतीस पडला. आणि जॅकी श्रॉफ रातोरात सुपरस्टार बनला. त्यानंतर एका पाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत जॅकीने अमाप पैसा कमावला. यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता या सर्वांच्या शिखरावर असताना जॅकीने एक मोठी चूक केली होती. त्याच्या या चुकीमुळे त्याच सर्वस्व पणाला लागलं.

परिस्थिती अशी आली होती की, त्याला घरातील फर्निचर देखील विकावे लागले होते. एका चित्रपटांमध्ये त्याने निर्माता म्हणून नशीब अजमावून पाहिले होते. परंतु हा चित्रपट पूर्णपणे अयशस्वी ठरला. बॉलीवूडमधील सर्वात खराब चित्रपटांपैकी एक म्हणून या चित्रपटाला ओळखलं जातं.

बूम हा 2003 मध्ये कैझाद गुस्ताद दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी थ्रिलर चित्रपट होता. जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफने याची निर्मिती केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, पद्मलक्ष्मी, मधु सप्रे, झीनत अमान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

या चित्रपटातून कतरिनाने पदार्पण केले. हा चित्रपट इतका मोठा फ्लॉप ठरला की त्याने जॅकी श्रॉफला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या चित्रपटाची आयुष्यभराची कमाई फक्त 1.20 कोटी होती. तर चित्रपटासाठी घेतलेले कर्ज 18 कोटी रुपये होते. बाकीचे देणं वेगळ होते. BOOM च्या अपयशाची अनेक कारणे होती.

परदेशात वाढलेल्या कैझाद गुस्ताद यांना भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीची कोणतीही माहिती नव्हती. चित्रपट बनवण्यातही भरपूर पैसा खर्च झाला. त्यामुळे श्रॉफ कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला. चित्रपटाची कथा, पटकथा चांगली नव्हती. कलाकारांचा अभिनयही काही जादू दाखवू शकला नाही. हा चित्रपट केल्यानंतर अमिताभ बच्चन खूप दुःखी झाले होते.

एक तर चित्रपटाला प्रेक्षकांनी दाद दिली नव्हती आणि समीक्षकांनी त्याच्यावर खूप टीका केली. दुसरीकडे, निर्मात्याने चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्याचे पैसे भरले नाही. त्यांना न्यायालयात नेण्याची ध’मकी दिली आणि मग पैसे मिळाले. बूम बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक फ्लॉप ठरला. या चित्रपटाची कथा फॅशन जगत आणि अंडर वर्ल्ड यांच्यातील संबंधांवर आधारित होती.

अमिताभ बच्चन डॉन झाले. दुबईत बरेच भाग शूट झाले पण प्रेक्षक त्याच्या कथेशी जोडले गेले नाहीत. फॅशन जगतातील ग्लॅमर प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणू शकले नाही. याउलट अमिताभ बच्चन यांना असा चित्रपट केल्याने त्यांना प्रचंड टी’केला सामोरे जावे लागले. हा चित्रपट इतका मोठा फ्लॉप ठरला की लोकांचे पैसे फेडण्यासाठी जॅकी श्रॉफचे सर्वस्व विकले गेले.

त्याला घरातील फर्निचरही विकावे लागले. कर्जातून मुक्त होण्यासाठी जॅकीला रात्रंदिवस मेहनत करावी लागली. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला होता पण सर्व काही उद्ध्वस्त झाले. जनतेचे ऋण फेडण्यासाठी जेवढे काम करता येईल तेवढे केले.

हे आवश्यक नाही की प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नेहमीच चांगली असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, आपल्याला फक्त आपल्या आदर्शांपासून डगमगण्याची गरज नाही. जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफनेही ते दिवस आठवले आणि सांगितले की, माझा बेडही विकला गेला आणि मी जमिनीवर झोपायचो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12