‘या’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवीने 1-2 नाही तर 5 अभिनेत्यासोबत केलं होतं विचित्र फोटोशूट! अभिनेत्यांनी बनियन तर तिनं घातलं होत फक्त….

‘या’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवीने 1-2 नाही तर 5 अभिनेत्यासोबत केलं होतं विचित्र फोटोशूट! अभिनेत्यांनी बनियन तर तिनं घातलं होत फक्त….

नुकतच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे दोघांनीही लोकलने प्रवास केला. यावेळी ते दोघेही बराच वेळ प्लॅटफॉर्मवर बसलेले होते. त्यादरम्यान अनेकांनी त्यांचे फोटो टिपले. तर स्वतः अनन्या पांडेने आपले फोटोज सोशल मीडिया वरती शेअर केले. अनेकांनी त्या दोघांचं कौतुक केलं.

मात्र अनेकांनी हे केवळ त्यांच्या आगामी लायगर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण्यात आलेलं स्टंट आहे, असं म्हणत त्यांच्यावर टी’का देखील केली. सेलिब्रेटीजने अशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची ही काय पहिली वेळ नाही. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी हे कलाकार अनेक चित्र-विचित् हातखंडे आजमावतात.

शाहरुख, सलमान, अक्षय कुमार, अजय देवगन आणि आमिर सारखे मोठाले कलाकार देखील यामध्ये मागे नाहीत. हे कलाकार वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करत आपल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांना आकर्षित करतात. मुलाखती, फोटोशूट सोशल. मीडिया वरती चाहत्यांसोबत संपर्क साधन या सर्व गोष्टी आता अगदी साधारण झाल्या आहेत.

केवळ आपला चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करावा म्हणून हे सेलिब्रिटीज काहीही करू शकतात. तुम्हाला जर वाटत असेल की आत्ताचे नवखे कलाकार सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा घेतात आणि काहीतरी विचित्र पद्धत करून केवळ चित्रपटाचे प्रमोशन करण्यावर भर देतात.

तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये अनेक दिग्गज कलाकार देखील मागे नाहीत. इंटरनेटच्या युगाआधी मॅगझिन्स आणि वर्तमानपत्रांमध्ये चित्रपटांचे प्रमोशन केले जात असे. सहाजिकच त्यामध्ये ठराविक जागा असल्यामुळे अनेक वेळा हे कलाकार काहीतरी वेगळे आणि हटके फोटोशूट करत असतात.

90 च्या दशकातील अशा वेगळ्या फोटोशूटचे अनेक फोटोज आपण पाहिलेच आहेत. मात्र यामध्ये एका अभिनेत्रीने सर्व मर्यादा ओलांडत खूपच वेगळं असं फोटोशूट केलं होतं. या फोटोशूट मध्ये अभिनेत्रीने एक किंवा दोन नाही तर चक्क पाच अभिनेत्यांसोबत वेगवेगळ्या पोजेस दिल्या होत्या. त्यावेळी या फोटोशूटची चांगली चर्चा रंगली होती.

ही अभिनेत्री अजून कोणी नसून श्रीदेवी आहे. बॉलिवूडमध्ये आजही श्रीदेवी यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पडद्यावरती केवळ तिला बघण्यासाठी चाहते गर्दी करत असत. त्यामुळे सहाजिकच तिने असं काही विचित्र फोटोशूट केले असेल यावर कदाचित आत्ता अनेकांचा विश्वास बसणार नाही.

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या आर्मी या चित्रपटासाठी श्रीदेवीने भन्नाट फोटोशूट केलं होतं. शाहरुख खान या चित्रपटात श्रीदेवीच्या पतीच्या भूमिकेत होता. तर इतर पाच अभिनेते सहकलाकार म्हणून झळकले होते. प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय, रवी किशन, मोहनीश बेहेल, सुदेश बेरी आणि हरीश कुमार असे पाच अभिनेते चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी आणि या पाच कलाकारांनी हटके फोटोशूट केलं. या फोटोशूट मध्ये पाच अभिनेत्यांनी केवळ बनियन घातले होते. तर श्रीदेवीने काळ्या रंगाचा जॅकेट ड्रेस परिधान केला होता. त्यावरती तिने लाल रंगाचा स्कार्फ डोक्याला बांधलेला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पुन्हा पाचही अभिनेत्यांनी पांढऱ्या रंगाचं बनियन घातले असून यावेळी श्रीदेवीने डेनिम जॅकेट आणि जीन्स घातल्याचे दिसते. पाच अभिनेत्यांसोबत अशाप्रकारे पोजेस देत त्यावेळी श्रीदेवीने चांगलीच चर्चा रंगवली होती.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.