या गंभीर आजाराशी झुंज देताय अशोक सराफ ! पत्नी निवेदिता यांच्या माहितीनंतर चाहतेही पडले चिंतेत…

अशोक सराफ म्हणलं की, अनेक वेगवेगळे पात्र आपल्या डोळ्यांसमोर उभे ठाकतात. मराठी सिनेसृष्टीमधील एक संपूर्ण काळ अशोक सराफ यांनी गाजवला, असं म्हणलं तर ते खोटं ठरणार नाही. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांच्या जोडीने अक्षरशः सगळीकडे धूम केली होती.
मराठी सिनेसृष्टीमधे तर कित्येक सुपरहिट चित्रपट या जोडीने दिले आहेत. चाहत्यांनी देखील या जोडीला डोक्यावर उचलून घेतले होते. अगदी सर्वसाधारण असा चेहरा, मात्र सोबतीला उमदा अभिनय आणि कोणतेही पात्र खुबीने रेखाटण्याची कला म्हणून अशोक सराफ सर्वांच्या आवडीचा अभिनेता ठरला.
आजही त्यांचे अनेक सिनेमा, चाहते मोठ्या आवडीने बघतात. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीमधे देखील अशोक सराफ यांनी आपली वेगळी ओळख बनवली होती. आपल्या खास अशा शैलीने सर्वाना खळखळून हसवणारे अशोक सराफ सध्या एका गंभीर आजाराशी झगडत आहेत. याबद्दल खुद्द त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी माहिती दिली आहे.
दुर्दैव म्हणजे त्यांना या आजाराने धड बोलताही येत नाहीये. एका कार्यक्रमा दरम्यान अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी याबद्दलची माहिती दिली. ही बातमी ऐकल्यानंतर मात्र अशोक सराफ यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. अशोक सराफ यांना लॅरेंजायटिस आजारानं ग्रासलं आहे.
अशोक सराफ यांचे परम मित्र ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे म्हणजेच यांच्या आत्मचरित्राचं दोन दिवसापूर्वीच प्रकाशन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मराठी इंडस्ट्रीतील दिग्ग्ज मंडळींनी हजेरी लावली होती. महेश कोठारे यांच्या पुस्तकाचे नाव आहे ‘डॅम इट आणि बरंच काही..’ याच कार्यक्रमात निवेदिता सराफ एकट्याच दिसल्या.
आणि त्यानंतर सगळीकडेच चर्चा सुरु झाली ते अशोक सराफ न आल्याची. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महेश कोठारे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्याचबरोबर सचिन पिळगावर यांनी देखील आपल्या मित्राच्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. मात्र सर्वांचे लाडके अशोक सराफ यावेळी गैरहजर होते.
यावरून, माघील बऱ्याच दिवसांपासून ते कुठे दिसलेच नाहीयेत हे देखील सर्वांच्या ध्यानात आले. त्यामुळे, याच कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी चाहत्यांच्या मनातला प्रश्न हेरला. अशोक सराफ कार्यक्रमास का उपस्थित राहिले नाहीत याचं कारण देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या,’ ‘आज अशोक या कार्यक्रमास हजर राहू शकला नाही कारण तो सध्या लॅरेंजायटिस(laryngitis) आजारानं त्रस्त आहे.
या आजारामुळे त्यांना बोलताही येत नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या नाटकाचे प्रयोगही रद्द करावे लागले. आज तो इथे नसला तरी महेशच्या आनंदात तो सहभागी आहे. त्याच्या पाठीशी एक मित्र तसंच अभिनेता म्हणून नक्कीच उभा आहे.’ या बातमीनंतर चाहते मात्र अशोक सराफ यांच्यासाठी चिंताग्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर ते या आजारातून बाहेर पडावे अशी प्रार्थना चाहते करत आहेत.