‘या’ कारणामुळे करीना कपूरने अजयला किस करण्यास दिला होता नकार, म्हणाली; मी फक्त सैफ सोबतच…

अभिनेत्री करीना कपूर ही आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. मात्र, सैफ अली खान सोबत लग्न झाल्यापासून ती काही मोजक्याच चित्रपटात दिसली आहे. असे असले तरी तिच्याकडे आणखी काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. करीना कपूर हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत रिफ्यूजी या चित्रपटातून पदार्पण केले.
रिफ्यूजी हा चित्रपट जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला जेमतेमच यश मिळाले. मात्र, या चित्रपटानंतर करीना कपूर ही चांगलीच भाव खाऊन गेली होती. या चित्रपटात तिचा सहकलाकार असणारा अभिषेक बच्चन याला मात्र अपयशाला सामोरे जावे लागले. अभिषेकचे अपयश अजूनही सुरूच आहे. त्याला म्हणावे तसे यश बॉलीवुड मध्ये मिळाले नाही.
मात्र, या तुलनेत करिना कपूर हिने अनेक दमदार चित्रपटात काम केले आहे. यामध्ये रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये तिने अनेक भागांमध्ये काम केलेले आहे. या सोबत तिचे इतर चित्रपटही प्रचंड गाजले होते. काही वर्षांपूर्वी करीना कपूर हिचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केले होते.
हा चित्रपट प्रचंड चालला होता. तरुणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात तिचा प्रियकर शाहिद कपूर दिसला होता. या चित्रपटांमध्ये या दोघांचा ली’प लॉक सिन प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र, करीना कपूर हिचे सुत सैफ अली खान याच्यासोबत जुळाले. सैफ अली खान याचे हे दुसरे लग्न होते.
त्याचे पहिले लग्न अमृता सिंह या दिग्गज अभिनेत्रीसोबत झाले होते. अमृता सिंह पासून त्याला सारा अली खान आणि इब्राहिम खान ही मुलं आहेत. असे असतानाही त्याने करीना कपूर सोबत लग्न केले. त्यानंतर करीनाला आता दोन मुलं आहेत. एका मुलाचं नाव तैमूर, तर दुसऱ्या मुलाचे नाव जेह असे आहे. करीना कपूर हिने अजय देवगन सोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.
सिंघम रिटर्न या चित्रपटातही तिने काम केले. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्री खूप चर्चा झाली होती. मात्र, या आधीही त्या दोघांनी काही चित्रपटात काम केले आहे. यामध्ये विशाल भारद्वाज यांचा ओमकारा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये दोघांनी इंटीमेट सीन दिले होते. या चित्रपटातील करीना कपूरच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते.
त्यानंतर तिने रोहित शेट्टी सोबतही गोलमाल सिरीजमध्ये काम केलेले आहे. करीना कपूरने त्यानंतर सैफ अली खान सोबत कुरबान या चित्रपटातही काम केले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचा प्रचंड वाद झाला होता. कारण दोघांनी अर्धन ग्न फोटोशूट करून पोस्टर तयार केले होते. याचा अनेकांनी विरोध केला होता.
त्यानंतर 2013 मध्ये प्रकाश झा यांनी सत्याग्रह या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि करीना कपूर यांची जोडी होती. एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान दोघांमध्ये इंटिमेट सीन करायचा होता. मात्र, करीना कपूर हिने हा सीन करण्यास नकार दिला. कारण की त्यावेळेस करीना कपूरचे सैफ अली खान लग्न झाले होते. त्यामुळे तिने सीन करणार नाही, असे सांगितले होते.