‘या’ कारणांमुळे माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चनसोबत ‘एकाही’ सिनेमात केले नाही काम; कारण अनिल कपूरने…

‘या’ कारणांमुळे माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चनसोबत ‘एकाही’ सिनेमात केले नाही काम; कारण अनिल कपूरने…

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एकही एकत्र असा सिनेमा केला नाही, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. आपल्या 5 दशकांच्या दीर्घ कालावधीत अमिताभ यांनी माधुरीसोबत एकही सिनेमा केला नाही.

‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमाच्या एका गाण्यात अमिताभ व माधुरी एकत्र ठुमकताना दिसले. पण या गाण्यात त्यांच्यासोबत गोविंदाही होता. आता माधुरी व अमिताभ यांचा एकही सिनेमा नाही, यामागे काय कारण असेल ते आपण बघणार आहोत. तर कारण आहे अनिल कपूर.

होय, माधुरीने 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये डेब्यू केला, तेव्हा सुरुवातीच्या काळात तिला फार यश मिळाले नाही. यामुळे अनेक मोठे अभिनेते तिच्या सोबत काम करण्यास कचरत. अशात माधुरीला एका हिट सिनेमाची गरज होती.

यादरम्यान अनिल कपूर माधुरीच्या मदतीला धावला. त्याने माधुरीसोबत काम करण्यास होकार दिला. पुढे माधुरी व अनिल या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. बेटा, तेजाब, परिंदा, हिफाजत हे त्यातले काही मोजेके सिनेमे. याच चित्रपटामुळे माधुरी स्टार बनली, हे नाकारता येत नाही.

माधुरी स्टार बनल्यानंतर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली. याकाळात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधीही तिला मिळाली होती. पण असे म्हणतात की, अनिल कपूर त्याकाळात माधुरीबद्दल अतिशय पझेसिव्ह होता. त्यानेच माधुरीला अमिताभ यांच्यासोबत काम करू दिले नाही. यानंतर अमिताभ व माधुरी हे दोन सुपरस्टार्स कधीच एकत्र दिसले नाहीत.

माधुरी व अनिल यांनी एकत्र 18 सिनेमे केलेत. पण एक वेळ अशी आली की, खुद्द माधुरीने अनिल कपूरसोबत सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला होता. होय, अनिल व माधुरी यांच्यात चांगली मैत्री होती. पण लोकांनी त्याला अफेअरचे नाव देण्यास सुरुवात केली होती.

आधी माधुरीने याकडे दुर्लक्ष केले. पण अफेअरच्या बातम्या जोरात सुरु झाल्यावर माधुरीने अचानक अनिल कपूरसोबत काम न करण्याच निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12