‘या’ एका चित्रपटामुळे ऐश्वर्याचे करियर झाले बरबाद, ‘तो’ एक सिन ठरला कारणीभूत….

ऐश्वर्या राय हे नाव माघील कित्येक वर्षांपासून आपल्या बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्ये देखील चांगलंच लोकप्रिय आहे. जगभरात वेळोवेळी ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा रंगतच असते. कदाचितच असं कोणीतरी असेल, जो तिच्या सौंदर्यावर भाळला नसेल. जगभरात ऐश्वर्याचे लाखो चाहते आहेत.
केवळ सौंदर्याच्याच नाही तर ऐश्वर्या अनेक वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत येतच असते. ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हणजे नेमकं काय असतं हे ऐश्वर्या कडे पाहिलं की समजतं. ऐश्वर्या राय केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंक्यपूर्वीच जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून सगळीकडेच ऐश्वर्याची चर्चा सुरु होती.
मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली. साऊथच्या जीन्स या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आणि त्यानंतर अनेक बॉलीवूड आणि साऊथच्या सिनेमामध्ये देखील तिने काम केले. इतकेच काय तर, तिने अनेक हॉलीवूडच्या सिनेमामध्ये देखील काम केले.
अलीकडच्या काळात ऐश्वर्या सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या वेगवेगळ्या फोटोने ती चाहत्याचे लक्ष वेधत असते. खासकरून ऐश्वर्या आपल्या लेकीसोबतचे गोंडस फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर ऐश्वर्याचे तब्बल 11. 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
यात सर्वात विशेष म्हणजे ऐश्वर्याने केवळ अभिषेक बच्चनला फॉलो केलं आहे. अनेकवेळा ऐश्वर्याशी निगडित जुन्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेत येतात. नुकतंच तिच्या खाकी चित्रपटाने १९ वर्ष पूर्ण केली आहेत. २३ जानेवरी २००४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, संजय दत्त, तुषार कपूर, ऐश्वर्या रॉयसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती.
भारतीय पोलीस दलावर आधारित असणाऱ्या या चित्रपटामध्ये अनेक थरारक स्टंटसुद्धा पाहायला मिळाले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला होता. ऐश्वर्या रायमुळे हा चित्रपट खूप जास्त चर्चेत आला होता. या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या सोबत असं काही घडलं होत की, त्यामधून ती मरता मरता वाचली.
ऐश्वर्या रॉयसोबत घडलेला भयानक प्रकार त्यावेळी बातम्यांमध्ये आला होता. या चित्रपटाचं शूटिंग सुरु होत. विशेष म्हणजे या चित्रपटातील अनेक स्टार्स ने स्वतः स्टंट्स करण्याला प्राधान्य दिल होत. आणि त्याचदरम्यान हा प्रकार घडला होता. एका सीनदरम्यान ऐश्वर्या रॉयला भरधाव येणारी जीप थांबवून त्यामध्ये चढायचं होतं.
परंतु सीनदरम्यान येणारी जीप इतकी भरधाव होती की, त्यावर ताबा ठेवणं कठीण झालं आणि यादरम्यान एक अपघात घडला ज्यामध्ये ऐश्वर्या रॉयचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या अपघाताने अनेकांची झोप उडवली होती. मात्र ऐश्वर्या यातून सुखरूप बचावली असल्याचं समजल्यानंतरच चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.