या आहेत बॉलिवूडमधील जिजा साली च्या सर्वात बेस्ट जोड्या, पहा नंबर 3 ची साली करून बसलीय रो-मा-न्स…

बॉलिवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या जोड्या लोकप्रिय असतात. पण आज आम्ही आपल्याला फिल्मी जगातील प्रसिद्ध जिजा-साली असलेल्या काही जोड्याचा परिचय करून देणार आहोत. जिजा आणि सालीमधील सं-बंध सहसा खूप खोडकर आणि चावट असतात. पण दोघांमधील हे नाते अगदी भावा बहिणीसारखे असते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या खूप फेमस आहेत. त्यापैकी एका जोडीने तर एकत्र चित्रपटात रोमँटिक सिन दिले आहेत.
1) जिजा – अक्षय कुमार, पत्नी – ट्विंकल खन्ना, साली – रिंकी खन्ना :- अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. २००१ साली त्याने बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले. पण लग्नानंतर ट्विंकलने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले. तिला रिंकी खन्ना ही एक बहीण आहे. अर्थात ती अक्षय कुमारची साली आहे. रिंकीने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. पण, काही कारणास्तव ती एक यशस्वी अभिनेत्री होऊ शकली नाही.
2) जिजा – अजय देवगन, पत्नी – काजोल, साली -राणी मुखर्जी आणि तनिषा मुखर्जी :- अजय देवगन बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. १९९९ मध्ये त्याने अभिनेत्री काजोलशी लग्न केले. अजय देवगण हा खूप भाग्यवान आहे की त्याला एक नाही तर दोन साली आहेत. यापैकी एक म्हणजे तनिषा मुखर्जी ही काजोलची खरी बहीण आहे. तिने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ती खूप फ्लॉप ठरली. दुसरी म्हणजे राणी मुखर्जी ही काजोलची खरी बहीण नाही तर दूरच्या नात्यातील चुलत बहीण असल्याचे दिसते. पण बॉलिवूडमध्ये राणीचे नाव किती मोठे आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे.
3) जिजा – सैफ अली खान, पत्नी – करीना कपूर खान, साली – करिश्मा कपूर :- २०१२ मध्ये सैफ आणि करीनाचे लग्न झाले. या लग्नामुळे करीनाची मोठी बहीण अर्थात करिश्मा सैफची साली झाली. सैफ आणि करिश्मा हे एकमेकांचा खूप आदर करतात. या दोघांनीही ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटात अनेक रोमँटिक भूमिका केल्या होत्या.
4) जिजा – राज कुंद्रा, पत्नी – शिल्पा शेट्टी, साली – शमिता शेट्टी :- शिल्पा शेट्टीची बॉलिवूड कारकीर्द खूप चांगली राहिली आहे. मात्र लग्नानंतर ती चित्रपटात फारच कमी दिसली आहे. शिल्पाने २००९ मध्ये उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. शिल्पामुळे आता राजची सुद्धा आता एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अर्थात राजची साली शमिता शेट्टीचे आपली बहीण शिल्पाप्रमाणे बॉलिवूडमध्ये नाव व ओळख झाली नाही. सन २००० मध्ये तिने ‘मोहब्बतें’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती पण सध्या ती एक इंटीरियर डिझायनर म्हूणन काम बघत आहे.
5) जिजा – शक्ती कपूर, पत्नी – शिवांगी कोल्हापुरे, साली -पद्मिनी कोल्हापुरे :- शक्ती कपूर हा बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो त्याच्या कॉमिक आणि खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. शक्ती कपूरने १९८२ मध्ये घरातून पळून जाऊन शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केले. शिवांगी एकेकाळची फेमस अभिनेत्री होती, पण तिची कारकीर्द काही खास राहिली नाही. त्याचवेळी शक्ति कपूरची साली आणि शिवांगीची बहीण पद्मिनी कोल्हापुरे हिचे बॉलिवूडमध्ये एक परिचित नाव बनत चाले होते.