‘या’ अभिनेत्रीने लग्नाआधीच दिला बाळाला जन्म, आता बाळ झाले २ वर्षाचे, ज्याच्यासोबत करणार होती लग्न त्यानेच गैरफायदा घेऊन दिले सोडून…

बॉलीवूडमध्ये कोणतीच गोष्ट शाश्वत नसते. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये आज यश आहे तर उद्या अपयश देखील असू शकते. असं म्हणलं जात की इथे प्रत्येक शुक्रावरी जसे सिनेमा बदलतात तसेच, नातेसुद्धा बदलले जातात. कधी काही नात्यांची जोरदार चर्चा होते आणि कधी ते नाते अचानकच संपुष्टात देखील येतात.
अश्या अनेक नात्यांबद्दल चर्चा रंगलेली आपण पहिली आहे. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते सोबत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांची प्रेमकहाणी सुरु होते. मात्र, काही अभिनेत्री आपले प्रेम या इंडस्ट्रीच्या बाहेर शोधतात. एमी जॅकसन ही सुद्धा त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. एक दिवाना था या सिनेमामधून एमीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये आपल्या सुंदर आणि बोल्ड लूकने तिने चांगलीच लोकप्रियता कमावली होती. त्यानंतर तिने दक्षिण सिनेमामध्ये देखील काम केले. आपल्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे आणि सोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील एमी नेहमीच चर्चेत असते. आणि आता एमी पुन्हा चर्चेमध्ये आली आहे.
यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण देखील तिचे वैयक्तिक आयुष्यच आहे. एमीने नुकतेच आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट करुन, स्वतःच्या भावी नवऱ्याचे म्हणेजच जॉर्ज पानायिटूचे सर्व फोटोज डिलिट केले आहेत. त्यानंतर आता एमी आणि जॉर्ज यादोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. मात्र, याबद्दल एमी किंवा जॉर्ज यादोघांनी अद्यापही कोणतेही अधिकृत विधान केले नाहीये.
2015 पासून ते दोघे नात्यात होते आणि त्यांना एक मुलगा देखील आहे, त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीमध्ये किती सत्य आहे हे सांगणे अवघड आहे. २०१९ मध्ये मे महिन्यात त्या दोघांचा जंगी साखरपुडा झाला त्याआधी जॉर्जने एमीला, जांबियाला अगदी फिल्मी पद्धतीने लग्नाची मागणी घातली होती. त्याचे सुद्धा फोटोज एमीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते.
त्यानंतर काहीच दिवसात ती आई होणार असल्याची बातमी समोर आली आणि सप्टेंबर २०१९ मध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर लवकरच एमी आणि जॉर्ज दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र अचानक एमीने त्याच्यासोबत असलेले सर्व फोटो आपल्या सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत.
एमीने असे का केले याबद्दल तिने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप सिंगर शेरिल कोलसोबत नात्यामध्ये होता. मात्र लवकरच त्यादोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर एमी आणि जॉर्जच्या नात्याला सुरुवात झाली. एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे आमचे नाते आहे असं, एमीने आपल्या आणि जॉर्जच्या अनेक फोटोवर पोस्ट करत लिहले होते.
काही दिवसांपूर्वीच एमीने आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता मात्र त्यामध्ये जॉर्ज नव्हता आणि आता तिने त्यादोघांचे सगळे फोटोज डिलीट केल्यामुळे, त्यांचे ब्रेकअप झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.