‘या’ अभिनेत्रीने नकार दिला म्हणून माधुरी दीक्षित बनली धक धक गर्ल, नाव वाचून चकित व्हाल…

‘या’ अभिनेत्रीने नकार दिला म्हणून माधुरी दीक्षित बनली धक धक गर्ल, नाव वाचून चकित व्हाल…

बॉलिवूड मध्ये आपण बघतो की एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता अमुक एक रोल करायला नको म्हणतो, आणि म्हणून तो रोल दुसऱ्या कलाकारांकडे जातो. आश्चर्य म्हणजे बऱ्याच वेळा ते रोल अपेक्षापेक्षा खूप हिट ठरतात आणि त्या संबंधित कलाकाराला प्रचंड प्रसिद्धी मिळते.

राम-लीला ह्या सिनेमासाठी सुरुवातीला करीना कपूरची निवड करण्यात आली होती, मात्र तिला त्या सिनेमामध्ये जास्त दम नाही वाटला आणि तिने तो सिनेमा सोडला. मात्र, दीपिका पादुकोण ला तिच्या जागी त्या रोल साठी घेण्यात आले आणि त्या सिनेमाने यशाची नवीन शिखरं गाठली..

तसेच दीपिकाला सलमान खान ह्याच्या, सुलतान ह्या सिनेमासाठी आधी फायनल केले गेलं होते. मात्र, दीपिकाला तिच्या पत्रामध्ये काही कमी वाटले म्हणून तिने नकार दिला आणि अनुष्का शर्माने त्या सिनेमामध्ये काम केले. सुलतान हा सिनेमा देखल खूप हिट गेला आणि, अनुष्का शर्माचे पात्र देखील अत्यंत लोकप्रिय ठरले.

असे फक्त आताच घडत नाही, तर बॉलिवूडची हि अत्यंत जुनी परंपरा आहे. जितके जुने बॉलिवूड आहे तेवढीच जुनी हि गोष्ट आहे..असेच काही घडले होते, माधुरी दीक्षित च्या बेटा सिनेमाच्या वेळी…

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील एक कमालीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ९० च्या दशकांत तर तरुणांमध्ये तिची अतिप्रचंड क्रेझ होती, आजही ती कुठेतरी कायम आहे. तिची फक्त एक झलक बघण्यासाठी तिचा चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये तुडूंब गर्दी करत असे. माधुरी दीक्षित हिला बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून देखील ओळखल जात.

धक धक या गाण्यामधील तिच्या मादक अंदाजाने तिला अजून एक नवीन ओळख मिळाली. परंतु तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल हे गाणं तिच्यासाठी लिहिलेलंच नव्हतं. तर, दुसऱ्या एका अभिनेत्रीसाठी हे गाणं लिहलं होत आणि त्या अभिनेत्रीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला म्हणून त्याठिकाणी माधुरीची वर्णी लागली. अन् या गाण्यानं तिला लोकप्रियतेच्या नवीन शिखरावर नेऊन बसवलं…

त्यावेळी, अनिल कपूर आणि श्रीदेवी ह्या दोघांची जोडी खूपच लोकप्रिय होती आणि आपल्या बेटा ह्या चित्रपटात अनिल कपूर-श्री देवी यांची सुपरहिट जोडी झळकावी अशी दिग्दर्शक इंद्रकुमार यांची इच्छा होती. मात्र एकीकडे, श्रीदेवी सतत केवळ अनिल कपूर सोबतच काम करत होती म्हणून तिला आता काही तरी बदल हवा होता.

मग त्यामुळे तिने ह्या सिनेमासाठी नकार दिला. दिग्दर्शक इंद्रकुमार ह्यांनी अनेकवेळा विनंती करून देखील श्रीदेवी ह्या सिनेमासाठी नकारचं दिला आणि म्हणून हा रोल माधुरी दीक्षितला भेटला. सिनेमाचे कथानक उत्तम असल्यामुळे माधुरीने इंद्रकुमार ह्यांची ऑफर स्वीकारली आणि ‘बेटा ‘ सिनेमा बनला. ह्याच सिनेमातील ‘धक धक’ गाणं चांगलंच सुपरहिट झालं.

त्यावेळी हे गाणं अत्यंत बो’ल्ड असल्याचं म्हणण्यात आलं होतं आणि सेन्सॉर बोर्डाने देखील गाण्यावर आक्षेप घेतला होता. १५ दिवसांचा वेळ ह्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी ठेवण्यात आला होता, मात्र सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं फक्त तीन दिवसांतच पूर्ण झालं. त्यानंतरच, श्रीदेवी आणि माधुरी ह्यांची तुलना सुरु झाली..

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.