‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात बायको देखील सोडायला तयार झाला होता सौरव गांगुली…म्हणाला बायकोला सोडून तिच्याशीच…

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात बायको देखील सोडायला तयार झाला होता सौरव गांगुली…म्हणाला बायकोला सोडून तिच्याशीच…

क्रिकेट आणि बॉलिवूडचा दीर्घ संबंध आहे. बऱ्याच क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. असेच काहीसे घडले भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबत. सौरव गांगुलीची पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही चर्चेत राहिल्या आहेत. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन 1996 मध्ये डोना हिच्याशी प्रेम विवाह केला होता.

एकेकाळी सौरव गांगुली आणि या अभिनेत्रीसोबत अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. दोघांच्या चाहत्यांना या अफेअरच्या बातमीने आश्चर्यचकित केले होते. सौरव गांगुलीने घरातून पळून जाऊन आपल्या बालपणातील मैत्रीण डोनाबरोबर कुटुंबाविरूद्ध जावून लग्न केले होते, हे आपणास  माहिती असेलच.

दोघांचेही बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. नंतर दोघांच्या कुटुंबाने देखील या लग्नास सहमती दर्शविली. त्यानंतर 21 फेब्रुवारी 1997 रोजी सौरव गांगुलीने डोनाशी पुन्हा कुटुंबासमोर लग्न केले. पण आज आम्ही बोलणार आहोत सौरव गांगुलीच्या बॉलीवूड प्रेमाविषयी. हो सौरव गांगुली हे अभिनेत्री नगमाच्या प्रेमात पडले होते.

अभिनेत्री नगमा आणि सौरव गांगुलीची 1999 मध्ये वर्ल्ड कप दरम्यान लंडनमध्ये भेट झाली होती. या भेटीनंतरच त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी डोना आणि गांगुलीच्या लग्नाला 3 वर्षांहून अधिक वर्षे झाली होती. जेव्हा सौरव गांगुली आणि नगमाच्या अफेअरची बातमी आली होती त्यावेळी थोड्याच दिवसात सौरव गांगुलीला टीम इंडियाचा कर्णधार बनविण्यात आले.

यामुळे तो प्रसिद्ध होता आणि या कारणामुळेच त्यांच्या अफेअरची बातमी वेगाने पसरू लागली. दक्षिण भारतातील अनेक न्यूज पेपर मध्ये मंदिरात पूजा करत असताना या दोघांचा फोटो समोर आल्यावर सौरव गांगुली आणि नगमा यांच्या नात्याविषयी चर्चा उघडकीस आली होती.

जेव्हा डोना यांना सौरव गांगुलीच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटस्फो-ट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण गांगुलीवर आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते, त्यामुळे तो नगमापासून दूर जावू लागला. अभिनेत्री नगमाने तिचे सौरव गांगुलीशी असलेले प्रेमसंबंध सर्व मिडिया समोर स्वीकारले होते. पण सौरव गांगुलीने या बातम्यांना प्रत्येक वेळी अफवा असेच म्हटले आहे.

आता १८ वर्षानंतर केले कबूल:- सौरव गांगुली आणि नगमाच्या अफेअरच्या सर्वत्र चर्चा झाल्या होत्या. परंतु त्यावेळी सौरव किंवा नगमा यापैकी कुणीही समोर येऊन मत मांडले नव्हते. आता 18 वर्षांनंतर नगमाने आपण सौरव गांगुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो अशी कबुली दिली आहे.

एका मुलाखतीमध्ये नगमा म्हणाली आमच्या विषयी ज्या काही चर्चा होत्या त्यास आमच्यापैकी कुणीही नकारलेले नाही. आमचे तोंड बंद होते. त्यामुळे याचा गैरफायदा घेत ज्याच्या मनात जे आले त्यांनी त्या चर्चा सुरू केल्या होत्या. नगमा सांगते 2000 मध्ये सौरव गांगुली करिअरच्या शिखरावर होता.

त्यावेळी टीम इंडियाचे फॅन्स भारताचा पराभव आणि कॅप्टनच्या परफॉर्मन्समध्ये आलेला बिघाड सहन करण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्याचा परिणाम आमच्या दोघांच्या रिलेशनशिपवर देखील झाला होता. त्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गांगुलीने सुद्धा आपल्या करिअरवर फोकस करणे अधिक महत्वाचे मानले.

सौरव गांगुलीने आपला इगो वाचवण्यावर अधिक भर दिला होता. आणि तो भार एकालाच सहन करावा लागणार होता. नेहमीच मोठ्या नफ्यासाठी छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो असे नगमाने या मुलाखती मध्ये म्हणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12