‘या’ अभिनेत्रीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने राखी सावंतला पो’लिसांकडून अ’टक..

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत दररोज चर्चेत असते. या अभिनेत्रीबाबत रोज काही ना काही बातम्या समोर येत असतात. त्याचवेळी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी राखी सावंतचा एका महिला मॉडेलसोबतचा वा’द सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. अशा परिस्थितीत आता राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राखीने पत्रकार परिषदेदरम्यान एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आ’क्षेपार्ह भाषा वापरली, त्यामुळे पोलिसांनी आता राखीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राखीने अभिनेत्री शर्लिन चोप्राचा अतिशय आक्षेपार्ह विडीयी दाखवला होता. आणि त्याच्यातील वा’द आता चांगलाच टोकाला पोहोचला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार राखीला अंबोली पो’लिसांनी अटक केली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने या बातमीला दुजोरा देत ट्विट केले की, ‘अंबोली पोलि’सांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अ’टक केली आहे.’ राखी सावंतचा ABA 1870/2022 काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.
राखी गुरुवारी दुपारी 3 वाजता तिची डान्स अकादमी लॉन्च करणार होती, जिथे तिने तिचा पती आदिल खान दुर्रानीसोबत भागीदारी केली. राखीचा भाऊ राकेश सावंत याने या प्रकरणामागे शर्लिन चोप्राचा हात असल्याचा खुलासा केला असून त्याने शर्लिनला फटकारले आहे. राखीच्या अटकेबाबत झूमशी बोलताना राकेश म्हणाले की, आईच्या आजारपणामुळे त्याची बहीण तपासात सहकार्य करू शकत नाही.
राकेश सावंत म्हणाले, ‘माझी आई आयसीयूमध्ये आहे, ती गं’भीर स्टेजवर आहे. बहिणीला पो’लिस तपास पूर्ण करता आला नाही. त्यामुळे कदाचित तिने तपासात मर्यादा ओलांडली असावी, त्यामुळेच राखीला अ’टक करण्यात आली आहे.’ राकेशने पुढे राखीला ‘महाराष्ट्राची जान’ म्हणून संबोधले आणि शर्लिन चोप्राला असे नाटक रचल्याबद्दल फटकारले.
तो म्हणाला, ‘मला असे वाटते… शर्लिन डोक्यावर पडली आहे. आणि खरोखरच ही खूप जास्त शरमेची बाब आहे. तिने कोणालाही सोडलेले नाही. राखी ‘महाराष्ट्राची ‘शान’ आहे, माझी बहीण एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तिला (शर्लिन) असे वागणे शोभत नाही, देव आमच्या पाठीशी आहे, आईच्या आशीर्वादाने राखीला काही होणार नाही.’
दरम्यान, शर्लिन चोप्राने ‘बिग बॉस सीझन 16’ मध्ये साजिद खानसाठी जाण्यास आक्षेप घेतला होता. राखी सावंतने या प्रकरणी उडी घेत साजिद खानला पाठिंबा दिला होता. यादरम्यान, पापाराझीसोबतच्या संभाषणात राखी शर्लिनविरोधात खूप बोलली होती. त्यानंतर शर्लिनने याबाबत पोलि’सांत तक्रार दाखल केली होती. राखीने नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या ओशिवरा पो’लिस ठाण्यात शर्लिन चोप्राविरुद्ध मा’नहा’नीचा खटलाही दाखल केला होता.